27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन…!

पर्यटनाचे महत्व आणि पर्यटनाची लोकप्रियता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने १९८०पासून “जागतिक पर्यटन दिन”(word tourism day)२७ सप्टेंबरला साजरा केला.पर्यटन ही संज्ञा प्रवास(tour)या शब्दाशी संबंधीत आहे.हा शब्द लॅटिन भाषेतील tornosया शब्दापासुन आलेला आहे.आपल्या भारतीय पुरातन ग्रंथानध्ये शांती आणि आनंदासाठी तसेच ज्ञानाचे साधन म्हणून पर्यटनाकडे पाहिले जायचे,तसेच आपल्या ऋषीमुनींनी देखील पर्यटनाला महत्वाचे स्थान दिले होते.एका व्यक्तीने कींवा समूहाने एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मनोरंजनासाठी,अभ्यासासाठी,एखाद्या कामासाठी केलेला प्रवास म्हणजे”पर्यटन”होय.अगदि पुर्वीपासून प्रवास करणे ही मनुष्य प्राण्याची सहज प्रवृत्ती आहे.पूर्वी प्रवासाचा मुख्य उद्देश म्हणजे नविन स्थळांना भेट देणे एवढ्यावरच मर्यादित होता.प्रवासामूळे विविध क्षेत्रातली संस्कृतीची ओळख,एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले.पर्यटन हे सामाजिक अभिसरण आणि संस्कृतिचे आदान प्रदान करणारे एक सशक्त माध्यम आहे.तसेच आजच्या या धकाधकीच्या,धावपळीच्या युगात पर्यटनाकडे विरंगुळा म्हणून पाहाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवास आणि पर्यटनाच्या वाढीसाठी या गोष्टी फार अनुकूल ठरल्या आहेत.
सध्याच्या स्थितीमध्ये पर्यटन हा जगातला सर्वांत वेगाने वाढणारा व्यवसाय आहे.कारण,काही देशाची अर्थव्यवस्था ही तेथील पर्यटनावर अवंलबून आहे.पर्यटन वाढीची मुख्य कारणे म्हणजे त्या देशातील निसर्ग संपन्न प्रदेश,वैभवशाली इतिहास,संस्कृती हे आहेत.निसर्गाच हे अनोख लावण्य,मनोहारी रुप,पर्यटकासाठी आकर्षनाचा मुद्दा आहे,जसे भारताच्या उत्तरक्षेत्रात पर्यटकांना लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारे आग्रा येथील ताजमहल एक मोठे पर्यटनस्थळ आहे.
पर्यटनाचे महत्व फक्त आजच्याच दिवसापूरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण वर्षभर जपले पाहिजे.पर्यटनामूळे रोजगार उपलब्ध होउन आर्थव्यवस्थेला चालना मीळत आहे,आपल्याकडे पर्यटनाचे महत्व सर्वप्रथम केरळ व गोवा या दोन राज्यांनी ओळखले,व त्यांचे नाव जागतिक पातळीवर गेले.गोवा व केरळ वगळता महाराष्ट्र,तामिळनाडू,उत्तरप्रदेश,या राज्यात विदेशी पर्यटकांचा नेहमीच वावर असतो.वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक येथे असतात,त्यामूळे भारताची वैद्यकीय सेवा प्रसिध्दीच्या झोतात आली आहे.

ख्वाजा मीर दर्द यांनी म्हटले आहे-

“सैर कर दुनिया की गाफिल
जिंदगानी फिर कहां
जिंदगी गर कुछ रही तो
ये जवानी फिर कहां”
खरच…या ओळी सर्वांना लागू होतात.जोपर्यत तारुण्य आहे तोपर्यंत जगातल्या विविध ठिकांना भेट देऊन आपल्या पर्यटनाची हौस भागवून घ्यावी..सर्वांना “जागतिक पर्यटन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *