चंद्रपुर ;
कमलापूर ता.जिवती जि.चंद्रपूर येथे
लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते अॅड. दत्तराज गायकवाड यांच्या पुढाकाराने विदर्भात स्वाक्षरी मोहीमेचा आरंभ करण्यात आला असून क्रांतीकारी शाहीर संभाजी ढगे हे स्वाक्षरी करून वर्गीकरण आंदोलनाला बळ देण्याचे अतिशय क्रांतीकारी भूमिका बजावली आहे.
लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष मा.रामचंद्रजी भरांडे साहेब यांच्या पुढाकाराने scआरक्षण वर्गीकरण कृती समिती महाराष्ट्र तर्फे आयोजित दहा लाख स्वाक्षरी मोहीम राज्य स्तरीय बैठकीला सहभागी संघटना प्रमुखाची दि.११ अॉक्टोबर २०२० रोजी सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.यामुळे निश्चितपणे scआरक्षिण वर्गीकरणाचा लढा गतिमान होण्यास मदत मिळणारच आहे.