लोहा तहसीलदारांना दिले निवेदन
लोहा ;
तालुक्यातील शेवडी (बाजीराव) येथे काल रात्री ढगफुटी होऊन रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडून गावाला गोदावरी नदीच्या पुराने सगळीकडून वेढा घातल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता.
शेवडी (बा.)येथे ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात विक्रमी 267 मिमी पाऊस पडल्यामुळे पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा याचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ करावे व शासनाने शेतकर्यांना सरसकट 50 हजार रुपये अनुदान मंजूर करावी अशी मागणी शेवडीचे माजी सरपंच कैलास बाबाराव धोंडे यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत माजी सरपंच कैलास बाबाराव धोंडे यांनी लोहा तहसीलदाराला दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, दि.२६ -९-२०२० व दि.२७ -९-२०२० रोजी च्या मध्यरात्री ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावातील गोदावरी नदीला महापूर आला या महापुराचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची पूर्णपणे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तात्काळ सातबारा प्रमाणे झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना शेवडीचे मा.सरपंच कैलास धोंडे, शिवा व्यापारी आघाडीचे लोहा तालुका अध्यक्ष गणेशराव घोडके , शिवा विध्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष राजकुमार पिल्लोळे,संगम एजगे ,आदी उपस्थित होते.
या निवेदनावर मा. सरपंच कैलास धोडे , माजी सरपंच माणिका चिकाळे ,सेवा सोसायटीचे चेअरमन शंकर बादवड,केशव टेळके , मन्मथ येजगे, रामजी डोंगरे ,शेख इसाक शेख नवाज ,दता येजगे , संगमेश्वर चपटे ,अरूण राईकवाडे ,कपिल तेजबंद ,चुडामन जाकापुरे , विश्वनाथ एकलारे , भागवत चिकाळे , मन्मथ लाठकर, निवृती आगबोटे , विश्वाभंर फुलझळके , विश्वनाथ चांडोळकर , मारोती चपटे , शिवलिंग चपटे आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत .