कंधार ; दिगांबर वाघमारे
गेल्या 10 ते 15 दिवसांपासून कंधार तालुक्यात पेठवडज, बारूळ, कुरुळा,बहादपुरा,कलंबर,कौठा, उस्मानगरसह इतर मंडळात पाऊसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान केले आहे. मुसळधार पाऊसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी दि.२८ सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने निवेदनाद्वारे तहसिलदारांना केले आहे.
26 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पाऊसाने पेठवडज व बारूळ या दोन्ही महसूल मंडळातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतांची अवस्था तळ्यासारखी झाली आहे तर ओव्हर फोलो झालेल्या पेठवडज तलावाच्या पाण्याने गोणार -जाकापुर रस्ता बंद केला आहे .
तरी दररोज पडणाय्रा पाऊसामुळे पिके पाण्यात वाहुन गेली आहे.आजुन पावसाचे प्रमाण तालुक्यात चालुच आहे. तालुक्यातील सोयबीन हळद ,तुर ,मुग,कापूस,उडीद,आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधिच मराठवाडा हा दुष्काळी भाग यात अतिवृष्टी संकट यामुळे शेतकरी हवालदील झाला असुन त्यांची उपजीविका भागविण्याचे सामर्थ्य देखील उरले नाही. पुढे चालुन शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. तरी शासनानी सरसगट शेतीची पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी व कंधार तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला न्याय देऊन शेतकरी बांधवांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने धरणे आंदोलन करण्यात असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .या निवेदनावर तालुका प्रहार अध्यक्ष कंधार
सुनिल पा.हराळे बाचोटीकर ,ज्ञानेश्वर तोरणे उम्रजकर,नवनाथ वाखरडकर,
राजेश शिरसे जाकापूरकर ,संदिप पवळे ,राघोबा पाटील कदम आदीच्या स्वाक्षरी आहेत.