नांदेड-
देशातील शेतकरी आणि कामगार यांना देशाधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. पार्श्ववी बहुमताचा गैरवापर करून मंजुर करून घेतलेल्या या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉग्रेस पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्च काढण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार्या या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चची सुरूवात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता रेल्वेस्टेशन समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात येणार आहे. हा लाँगमार्च त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून देशाचे कणखर माजी पंतप्रधान यांच्या लाल बहादुर शास्त्री यांच्या मनपा समोरील पुतळ्यास पुष्पहार घालून लाँगमार्चची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघणार्या या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चमध्ये माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.माधवराव पा.जवळगावकर,आ.रावसाहेब अंतापूरकर, आ.मोहन हंबर्डे, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.वसंतराव चव्हाण,माजी आ. हणमंतराव पा.बेटमोगरेकर हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांना भेटून केंद्र शासना विरूध्दचे निवेदन देणार आहे. सोशल डिस्टन्सींगचा वापर करून आयोजीत केलेल्या या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्च मध्ये शेतकरी आणि कामगार यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मो.मसुद खान, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती अॅड.रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पा.रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अमित तेहरा, नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.निलेश पावडे, सभागृह नेता विरेंद्रसिंग गाडीवाले,नांदेड पंचायत समितीच्या सभापती कावेरीताई वाघमारे, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.सरिता बिरकुले, उपसभापती ज्योत्सना गोडबोले, जि.प.सदस्य मनोहर शिंदे, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब यांनी केले आहे.