11 आक्टोबर रोजी औरंगाबाद येथे आयोजित बैठकीला राज्यातील विविध संघटना प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे प्रा.रामचंद्र भरांडे यांचे आवाहन


सप्रेम जय लहुजी!! जय भीम..!!

आपणास माहीतच आहे की, आपण सर्वजन अनेक वर्षांपासून सामाजिक हिंताच्या प्रश्नावर लढत आहोतचं,परंतू यापुढे आपणास आरक्षण वर्गीकरणाचा लढा गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागाने SCआरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या माध्यमातून लढणार आहोत.
समाजाच्या एकून प्रवासात आजपर्यंतचे आपले योगदान अतिशय उल्लेखनीय राहीले आहे…आपण अतिशय मोठ्या कष्टाने समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडले आहेत..आपल्या कार्याची नोंद इतिहास नक्कीच घेईल.

येत्या 11 आक्टोबर रोजी औरंगाबाद येथे जी बैठक आयोजित करण्यात आली आहे ती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे…
यासाठी खालील विषयावर चर्चा व निर्णय घ्यावयाचे आहे.
👉🏻 आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे स्वरुप कसे असावे;त्याची रचना कशी असावी.
👉🏻 हा विषय सोडविण्यासाठी कोण कोणते उपक्रम राबविले जावेत
👉🏻 आंदोलनाचे स्वरुप व स्थळ कोणते असावे.
👉🏻 लढण्यासाठी आर्थिक साधनांचे स्ञोत काय असावेत
या बाबत आपल्या सुचना ह्या लेखी स्वरूपात मांडणी करून घेऊन यावे म्हणजे येत्या काळात मार्गदर्शक राहतील.
कमी वेळात जास्तीत जास्त विधायक चर्चा होऊन आपण सर्वांना कृती समिती आणि कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी आपल्या लेखी निवेदनासह उपस्थित महत्त्वाची आहे.


प्रा रामचंद्र भरांडे,संस्थापक ,

अध्यक्ष लोकस्वराज आंदोलन चळवळ

महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *