कंधार ; दिगांबर वाघमारे
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत दिनांक 30 सप्टेंबर रोजी कंधार येथिल गटसाधन केंद्र येथे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात येवून तालुक्यातील अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत आठावा घेण्यात आला.त्यावेळी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रिनीवल शंभर टक्के ध्येय पुर्ण करण्याचे गटशिक्षणअधिकारी रविद्र सोनटक्के यांनी आवाहन केले.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रिनीवल 2020-21 च्या तालुका निहाय व शाळा निहाय पेंडिंग याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.तसेच वरील याद्या प्रत्येक शाळेच्या शाळा लॉगिन ला पण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
कंधार तालुक्यातील अधिनस्त शाळांना या याद्या देऊन दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आपल्या अधिनस्त शाळांमधील विद्यार्थ्यांचे 100% अर्ज यंत्रणेमार्फत भरण्या बाबत आवाहन करण्यात आले होते.
नांदेड जिल्हाचे एकुण ७३ टक्के काम पुर्ण झाले आहे.तर त्यात कंधार तालुक्याचे पण ७३ टक्के काम झाले असून ते शंभर टक्के पुर्ण करण्याचे उदीष्ये ठेवण्यात आले आहे.तर जिल्यात भोकर तालूका पहील्या क्रमाकावर असून शेवटचा तालूका मुखेड आहे.जिल्हात ५१ हजार सातशे १२ पैकी १३ हजार आठशे ७० अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रिनेवल करणे बाकी आहे.
तसेच या यादी व्यतिरिक्त शाळेत शिकत असणाऱ्या व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती च्या अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फ्रेश अर्ज भरावेत.तसेच विलंब होणार नाही याची दक्षता घ्याण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
तसेच यावेळी शालेय पोषण आहार वाटप ,६ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांनासाठी इन्पायर अवार्ड मिळण्यासाठी नोंद करावी ,मासिक अहवाल सादर करण्यात याव्या ,तसेच कोरोना काळात व्हर्चूअल क्लास सुरु करण्याबाबत आवाहन करण्यात आले .
यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी संजय यरमे ,केंद्रप्रमुख माधव कांबळे ,गणेश थोटे आदीची उपस्थिती होती.