कंधार ; दिगांबर वाघमारे
येथिल गटसाधन केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक यदुराज धैर्येधर गबाळे २१ वर्ष सेवा पुर्ण झाली असून त्यांचा सेवानिवृती बद्दल गटसाधन केंद्र कंधार येथे गटशिक्षणअधिकारी रविद्र सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली दि.३० रोजी सपत्नीक सत्कार करण्यात आला.
गटसाधन केंद्र कंधार येथे यावेळी गटशिक्षण विस्तार अधिकारी संजय एरमे ,सतिश व्यवहारे ,वसंत मेटकर यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.तसेच केंद्र प्रमुख पदावरुन पदोन्नत झालेले शेकापूर बिटात विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती झालेले राजेश्वर पांडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक महासंघ शाखा कंधार व विविध शिक्षक संघटनेच्या वतीने राजहंस शहापुरे ,भास्कर कळकेकर ,बसवेश्वर मंगनाळे ,हरीहर चिवडे,डी.जी.वाघमारे ,महमंद अन्सारोद्दीन ,मंजुर परदेशी ,मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापिका सौ.चित्ररेखा गोरे ,गोविंद कौसल्ये ,विस्तार अधिकारी सतिश सोनटक्के ,केंद्रप्रमुख स्वामी ,आदीनी मनोगत व्यक्त केले .गबाळे यांच्या कार्यात कार्य रजिस्टर ,किंवा अन्य शैक्षणिक शाळेतील शालेय पोषण आहार योजनेतील बाबीचा ताळेबंद अद्यावत ठेवण्याचे काम यदूराज गबाळे यांनी केले आहे.यापुढील सेवानिवृती नंतर पुढील आयुष्य आनंदी घालवण्याचे सल्ला गटशिक्षणअधिकारी सतिश व्यवहारे यांनी मनोगतातून दिला.
तसेच शिक्षणविस्तार अधिकारी पदी नवनियुक्त झालेले राजेश्वर पांडे यांनी जिवनात योग्यवेळी पदोन्नती मिळाल्या बद्ल आभार मानून सत्कार केल्याबद्दल आभार मानले.तर सेवानिवृतीबद्दल सत्कार बद्दल यदुराज गबाळे यांनी सर्वांचे आभार मानले.
गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त करताना पद महत्वाचे नसून मिळालेली भुमीका किंवा कार्य मन लावून करणे महत्वाचे असते .सेवा बजावत असताना अनेक अडचणी येतात ,एक काम झाले की दुसरे काम तयारच असते .म्हणून जिवनात न थकता अविरत आंनद राहून राहीलेले छंद जोपासण्याचा सल्ला दिला ..
. अनुभव कामाला येते उत्साही मानूस कधिही सेवानिवृत होत नाहीत.तर सदैव ते काम करत राहतात असे सांगितले तसेच राजेश्वर पांडे यांना पदोन्नती बद्दल शुभेच्छा दिल्या .
प्रशासन चोख चालवण्यासाठी निर्धारीत कामे वेळेत पुर्ण करुन कंधार तालुक्यातील गुणवता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमास धोंडीराम गुंटूरे,दतुसिंग चव्हाण ,अविनाश पांचाळ ,शिवाजी पाटील डिकळे,इंजिनिअर शेख,आनंद तपासे ,शिवकुमार कनोजवार,सिद्धु मलगीरवार ,बालाजी निवळे,ज्ञानेश्वर चाटे,प्रशांत नरहरे,प्रद्धूग्नसींंग काळे,प्रतिभा सोनकांबळे ,परेमेश्वर बोरीकर,संगिता शिंदे ,बालाजी रविराव ,कांबळे मँडम आदीसह गटसाधन केंद्रातील कर्यचारी यांनी परीश्रम घेतले.