नांदेड ;
प्रशांत दिग्रस्कर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते दि.३० सप्टेंबर रोजी इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासपूर्ण असलेली संपूर्ण जिल्ह्यात अशी कोणीही वाटप केलीली नाही अशी स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळेस विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे व केंद्रप्रमुख माधव जाधव प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा व सर्व शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रा यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद हायस्कूल वाघी ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेणारी व गुणवत्ता वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारी शाळा आहे असे मत यावेळी व्यक्त केले. ऋषिकेश ढाके यांनी झूम अँप वर घेत असलेल्या अभ्यासाची माहिती घेतली. गृह भेटी कश्या पद्धतीने देत आहेत मुले अभ्यास करत आहेत का ? मुलांना ऑनलाईन अभ्यास समजतो का काही अडचणी येतात का याबाबत माहिती घेतली.
तसेच पाठ्यपुस्तके वाटप,परिसर स्वच्छता याबाबत माहिती घेतली. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी स्वच्छता कशी ठेवावी स्वतः कसे कोवीड पासून दूर राहू याबाबत मार्गदर्शन केले. स्वाध्याय पुस्तिका कशी सोडवावी, शिक्षक मित्र, पालक मित्र, व्हाट्सअप, टीव्ही वरील शैक्षणिक कार्यक्रम या माध्यमातून शिक्षण चालू ठेवण्याचे आव्हान केले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांन सोबत चर्चा केली. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. हेमंत कार्ले यांनी मांनले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजाराम कराळे,सुदर्शन बिंगेवर,डॉ. दत्तात्रय जोशी,रावसाहेब देवकत्ते,रामदास अलकटवार, बालाजी गीते,अनंता बैस,शिवाजी माने,श्रीधर जोशी,विलास झोळगे , रघुनाथ शेळके , सौ. जयश्री वडगावकर,सौ लता धर्मापुरीकर, सौ सुरेखा काळे, सौ नंदा चक्रवार,हेमंत शंकरराव वागरे, नामेवार, वाघमारे ताई आदींनी परिश्रम घेतले.