अहमदपुर ; प्रा.भगवान आमलापुरे
अहमदपूर येथील जेष्ठ गांधीवादी, गांधी विचाराचे अभ्यासक आणि गांधी साहित्य – विचार प्रेमी भागवतराव येनगे सर यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकाराने आज दि. ०२ आँक्टो २०२० रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त, येथील लातूर रोडवरील, त्यांच्या राहत्या नगराला म्हणजे म.गांधी महाविद्यालयाच्या पुढील काँलनीला म.गांधी नगर असे नाव देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक अभय मीरकले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गर्दी न करता मोजक्या नगळवासीयांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे. असी माहिती प्रयोगशील शेतकरी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव पलमटे यांनी दिली.
या पाश्र्वभूमीवर, म.गांधी विचार आणि साहित्याचे अभ्यासक भागवराव येनगे सर यांना प्रा भगवान आमलापुरे यांनी बोलतं केलं त्यावेळी ते म्हणाले, गतवर्षी म.गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त आमच्या राहत्या नगरास म.गांधी नगर असे नाव देण्याचा विचार प्रबळपणे मनात आला. तो विचार यावर्षीही मनात घर करून तेवढाच प्रबळ आहे.त्यामुळे आमच्या राहत्या नगराच्या नामकरणासाठी एक आणि तळेगाव रोडसाठी एक अशा दोन पाटया जवळपास ३५०० रुपये खर्च करून तयार करून घेतल्या आहेत. या दोन्ही पाट्यावर म.गांधी यांच्या आकर्षक प्रतिमा आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पाट्यावर वरील बाजूस ” मेरा जीवन ही मेरा संदेश है ! हा राष्ट्रपिता म.गांधी यांचा संदेश लिहिला आहे. म.गांधी जयंतीचे निमित्त साधुन दि. ०२ आँक्टो २० रोजी हा छोटेखानी कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.नगरसेवक अभय मिरकले,जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, बाबूराव आरसुडे आणि एकनाथराव पलमटे यांची प्रमुख तर मोजक्या नगळवासीयांची उपस्थिती राहणार आहे. बाहेर गावातील कोणीही कार्यक्रमास येणार नाही. असे एकनाथराव पलमटे यांनी सांगितले.
भागवत येनगे सर म्हणाले की दोन वर्षांपूर्वी म.गांधी यांचे पणतू तुषार गांधी अहमदपूर येथे आले होते. तो संदर्भ देऊन मी तुषार गांधी यांना पण आमंत्रित केलो आहे. पण कोरोनामुळे ते प्रत्यक्षात हजर राहणार नाहीत पण आँनलाईन मार्गदर्शन करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
आज नामकरण होणाऱ्या म.गांधी नगरास वर्ष १९८४ च्या शहर ले – आऊटनुसार केवळ गांधी नगर एवढाच उल्लेख आहे. गांधी नगर म्हणजे स्व.राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी असाही अर्थ होतो. त्यात हे सर्व जण आले.म्हणून त्यास म.गांधी नगर असे विशेष नाव देण्यात येणार आहे.
येनगे सरांकडे गांधी विचारधारेचे,गांधी साहित्याचे ३० – ३२ पुस्तके संग्रही आहेत.२०००-०१ साली ” सकाळ ” वर्तमानपत्रात प्राचार्य डॉ शिवाजीराव भोसले सरांचे ” जागर “हे सदर प्रकाशित होत होते. ते मी अवार्जुन वाचत होतो. बऱ्याचवेळा त्यांनी म.गांधी विषयी पण विचार मांडले होते. त्यातून प्रेरणा घेऊन नकळत मी गांधी साहित्य आणि विचारधारेकडे वळलो, असे सर नम्रपणे नमूद करतात.
तब्बल दीड तप तुम्ही गांधी विचार,गांधी साहित्याचा अभ्यास करत आहेत. आज आपणास काय वाटतं सर, या प्रश्नाचे उत्तर देताना सर म्हणाले की अभ्यास करून आणि केवळ सिद्धांत माहिती करून घेण्यात काही हशीलही नाही आणि आनंद तर नाहीच नाही. तर गांधी विचारांच्या आचरणाने आणि प्रत्यक्ष कृतीने आनंद आणि समाधान मिळते. असे ते म्हणतात. निश्चितच खादीचे कपडे वापरावे. ते आरोग्यासाठी चांगलेच आहेत. मी पण मध्यंतरी ०४ वर्षे खादी कपडे वापरले आहेत. नंतर काही कारणाने त्यात खंड पडला आहे. केवळ खादी वापरून नाही तर माणसाच्या मनात आणि विचारात बदल होऊन ते विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.
शिवाय सेवानिवृत्त झाल्यावर म.गांधी यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. दरवर्षी शाळेत सर गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी- विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. गतवर्षी म.गांधी जयंती निमित्त गांधी विचार परिक्षा घेतली होती. पण यंदा त्यात खंड पडल्याची खंत सरांनी बोलून दाखवली.
प्रा भगवान कि.आमलापुरे
फुलवळ मो.९६८९०३१३२८
द्वारा शं गु महाविद्यालय धर्मापुरी.
ता.परळी ( वै. )४३१५१५