कंधार ;
शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या कंधार येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे साहेब यांच्या कंधार येथेल संपर्क कार्यलयात दिनांक ०२/१०/२०२० रोजी. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोविड-१९ यांचे अनुषंगाने शासनाने निर्देशीत केलेल्या नियमांचे पालन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर, राष्ट्रवादीचे विधानसभा कार्याध्यक्ष दत्ताभाऊ कारामुंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे व इतर कार्यक्रते यांची उपस्थिती होती.