दैनिक सकाळ चे बातमीदार तथा फुलवळ सर्कल प्रमुख,फुलवळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा बा.पाटील बोरगावे यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो मला पत्रकार धोंडिबा बोरगावे सरकडे पाहिले की एक गाववेडा माणूस आहे. असं वाटतं. त्यास कारणही तसंच काहीसं आहे. सर नोकरी न करता गावात राहतात, रमतात. एवढेच नाही तर गावासाठी काही तरी करण्याच्या सतत प्रयत्नात असतात. मग ते बातमीच्या माध्यमातून असो किंवा इतर कोणत्याही माध्यमातून. उदाहरण म्हणजे, सकाळ रिलीफ फंडातून नदीच्या पात्रातील गाळ काढणे .म्हणजे पाणी अडवणे आणि ते जिरवणे.
एका अर्थाने त्यांनी जिरवायचे असेल तर पाणी जिरवा आणि अडवायचे असेल तर पाणी अडवा .हा केवळ व्हाट्सएपच्या माध्यमातून फिरणारा संदेश आपल्या क्रतीतून,आचरणातून सिद्ध करून दाखवला. त्यामुळे, त्यावेळी आम्हा सबंध फुलवळकरांच्या आशा आणि आकांक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. कारण दुष्काळ पाठ सोडायला तयार नव्हता. शेतकऱ्यांसह कर्मचारी आणि व्यावसायिक पण शेतकऱ्यांचीच भाषा बोलत होते. ती म्हणजे गेलेले साल बरे होते.शिवाय माझ्या सारख्या चंचल व्रतीच्या,मनानं हळव्या असणाऱ्या आणि मनापासून ना उमेद झालेल्या माणसाला नदीच्या पात्रातील गाळ काढणे म्हणजे चांगल्या उद्याची आणि चांगल्या भविष्याची जणू हमी वाटली.
सरांना गावची सर्वाधिक आणि सर्वांगीण जाण आहे. म्हणून सर गावची शान आहेत.त्यामुळे कै.केशवराव गुरुजींच्या शब्दात सांगायचे झाल्यास, त्यांना गावाबाहेरही मान आहे.मी असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
मी दैनिक सत्यप्रभाचा स्थानिक वार्ताहर झालो. तेव्हा बोरगावे सरनी मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे आमलापुरे सर फक्त आपण कुणावरही वैयक्तिक पातळीवर चिखलफेक करायची नाही. ते मला आजही कायम आठवणीत आहे.
मी जेव्हा जेव्हा माझ्या वैयक्तिक कामासाठी गावाकडे म्हणजे फुलवळला जातो तेव्हा तेव्हा त्यांना भेटण्याचा प्रमाणिक प्रयत्न करतो. आणि सर ही प्रामाणिकपणे अगदी गावाबाहेरच्या पाहुण्यासारखं मला जेव्हढया सन्मानने त्यापेक्षा अधिक प्रेमाने आणि आपुलकीने,जाणकार फुलवळकराची पसंत आणि ओळख असणाऱ्या शेंबाळयाच्या हाँटेलचा गोल्डन चहा पाजतात. खरे तर हा वर्गमित्र सोडून फार कमी जण चहा पाजतात. त्यात सरांचा अग्रक्रम असतो.
परत एकदा पत्रकार धोंडिबा बोरगावे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आणि सरस्वती चंद्र या हिंदी चित्रपटातील या दोन ओळी.
छोड दे हरा – भरा
गाव सारा.
नोकरी ( पैसे ) के लिए।
ये मुनासिफ नहीं
बोरगावे सर के लिए।
प्रा भगवान कि.आमलापुरे.
फुलवळ मो.९६८९०३१३२८