नांदेड-
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने शेतकरी व कामगार यांना देशोधडीला लावणारे विधेयके बहुमताच्या बळावर मंजूर करून घेतली आहेत. मात्र शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारी ही विधेयके राज्यात लागू होणार नाहीत अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी व कामगारांची फसवणूक करणार्या विधेयकाच्या विरोधात शुक्रवार दि.2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चचे आयोजन केले होते. या लाँगमार्चच्या समारोप प्रसंगी ना.अशोकराव चव्हाण यांनी मोदी सरकारच्या धोरणावर तोफ डागली आहे.
लाँगमार्चची सुरूवात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता रेल्वेस्थानकासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महापालिकेतील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत लाँगमार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी ना.अशोकराव चव्हाण बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ना.अशोकराव चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने बहुमताच्या बळावर कृषी व कामगारांशी संबंधीत कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यामुळे शेतकरी व कामगार भविष्यात अडचणीत येणार आहेत. मोदी सरकार व्यापारी व उद्योजकांना हाताशी धरून इंग्रजाच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीसारखे वागत असल्याचा आरोप केला आहे. कोणतेही विधेयक पास करण्यापूर्वी राजकीय पक्षांना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र राजकीय पक्षाशी चर्चा न करताच विधेयक पास करण्यात आले. मोदी सरकारने यापूर्वी नोटबंदी करून सर्व सामान्यांना दोन महिने बँकेच्या रांगेत उभे केले. तर जीएसटी लागू करून व्यापार्यांनाही अडचणीत आणले आहे.
संसदेत नुकतीच कृषी व कामगार विधेयके मंजूर करण्यात आली. या विधेयकामुळे शेतकरी व कामगारांच्या अडचणी वाढणार आहेत. शेतमाल, जीवनावश्यक वस्तू याचा साठा करून ठेवण्याची मर्यादा पूर्णपणे काढून टाकल्यामुळे शेतकरी व ग्राहकांचा फायदा होणार नसून साठेबाजी करणार्या भांडवलदारांचा फायदा होणार आहे. बहुमताच्या बळावर मोदी सरकार ही विधेयके पारित केली असली तरी राज्यात ही विधेयके लागू होणार नाहीत अशी ग्वाही ना.अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. सध्या देशात हुकूमशाही सुरू आहे. यासाठी सर्वांनी संघटीत होऊन सर्वसामान्यांचे हिताचे सरकार यावे यासाठी या पुढील निवडणुकीत आपल्या विचाराच्या पक्षाशी खंबीरपणे पाठी रहा असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी माजी खा.तुकाराम रेंगे यांनीही मोदी सरकारच्या धोरणावर टिका करत मोदी सरकारने लागू केलेली ही विधेयके शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारी आहेत. सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचे सरकार केंद्रात आल्यास या विधेयकात निश्चित बदल करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी आ.अमरनाथ राजुरकर म्हणाले की, मोदी सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेत आहे. काँग्रेस पक्ष शेतकरी व कामगारांच्या पाठिशी भक्कपणे उभा असून या विधेयकाच्या विरोधात आपला संघर्ष सुरूच राहणार आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई केंद्र सरकारने राज्याला द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी आ.मोहनराव हंबर्डे, आ.रावसाहेब अंतापूरकर, मंगलाताई निमकर आदिंनी विचार मांडले. प्रास्ताविक काँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष अॅड.निलेश पावडे तर सुत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केेले आहे.
यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे उपमहापौर मसुद खान, जि.प.सभापती संजय बेळगे, अॅड.रामराव नाईक,बाळासाहेब पा.रावणगावकर, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती सरिता बिरकले, उपसभापती ज्योत्सना गोडबोले, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर, काँग्रेसचे सरचिटणीस संजय लहानकर, स्थायी समिती माजी सभापती किशोर स्वामी,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, जगदिश पा.भोसीकर,उध्दवराव पवार, संभाजी भिलवंडे, बालाजी पांडागळे, शिवाजी पा.पाचपिंपळीकर, आनंद भंडारे, भाऊसाहेब मंडलापूरकर, अॅड.प्रितम देशमुख, लिंगाराम पा.कवळे, विकास देवसरकर, संजय राठोड, के. सुर्यकांत रेड्डी, अनंत केशवे, माजी महापौर प्रकाश मुथा, बलवंत सिंग गाडीवाले, सतीश देशमुख तरोडेकर, लक्ष्मीकांत बोने, गंगाधर सोंडारे, रोहिदास जाधव,विठ्ठल पावडे, कविताताई कळसकर, उमेश पवळे, नागनाथ गड्डम, दयानंद वाघमारे, संतोष मोरे, संजय मोरे, भास्कर जोमेगावकर, संतोष कुलकर्णी, शंकर कंतेवार, जनार्धन बिराजदार, बाबुराव सायाळकर, मारोती बल्लाळकर, पांडुरंग पाटील, भगवान कदम, शेख चाँदपाशा, संभाजी पुयड, मधुकर पाटील पुणेगावकर, हरिदंरसिंघ संधु, नागराज सुलगेकर, हंसराज काटकांबळे, संजय राठोड, शंकर नांदेडकर आनंदराव क्षिरसागर, आनंदराव कपाटे, श्रीराम पाटील, राजाराम गायकवाड, भुषणसिंह परिहार, गंगाधर वैद्य, श्रीनिवास मोरे, गणेश बोंढारे, साहेबराव धनगे, बालाजी भोरगे, आनंद गुंडले, उमाकांत पवार, राजू काळे, संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड, विठ्ठल जाधव, अविनाश कदम, ईश्वर चव्हाण, विजयकुमार मंगनाळे, सय्यद जुबेर, गंगाधर सोनकांबळे, संजय वाघमारे, संघरत्न कांबळे, सत्यपाल सांवत, प्रल्हाद सोळंके, निळकंठ मदने, बाळू पाटील, सुनिल लोहकरे, राजेश हंबर्डे, राजेश लोणे, सुभाष पाटील, दिपक पाटील, सलीम चावलवाला, कैलास जाकापुरे, राजु शेट्टे, बबन वाघमारे, शंकर शिंदे, उमेश चव्हाण, सुभाष रायबोले, विलास धबाले, फय्युम, रमेश गोडबोले, सचिन टाले, भानूसिंघ रावत, उमेश पवळे, संतोष मुळे, सौ.कविता मुळे, दिपक पाटील, किसन कल्याणकर, कैलास जाकापुरे, प्रफुुल्ल सावंत, सुनिल आटकोरे, संजय लोणे, किसनराव लोंढे, दत्ता पा.हळदेकर, भिमराव गायकवाड, सुभाष पाटील, अमित वाघ, अनिता हिंगोले, सुषमा थोरात, सविता गायकवाड, ललिता कुंभार, डॉ.रेखा पाटील, अलका शहाणे, ज्योती पारडीकर, सौ.जयश्री पावडे, अतुल वाघ, नवनाथ कदम, नारायण श्रीमनवार, प्रल्हादराव ढगे, कल्याण सुर्यवंशी, आर.एस.खान, किशोर भवरे, अब्दुल खय्युम, रामराव कदम, तात्याराव शिंदे, बापूराव खाकरे, संदिप सोनकांबळे, दुष्यंत सोनाळे, राजु यन्नम, शेख अली, संजय गोटमुखे, शिल्पा नरवाडे, सौ.ज्योती पाठक, सौ.उज्वला इंगोले, सौ.जयश्री जायस्वाल, जेसिका शिंदे, सौ.सविता गायकवाड, सौ.शिवनंदा देशमुख, मनोजसिंह ठाकूर, देविदास सरोदे, गुलाबसिंग ठाकूर, बालाजी मद्देवार, प्रा.मनोहर पवार, बाबुभाई खोकेवाले, संजय बांपटवार, सत्यजित भोसले, गोविंद तोरणे, भुमन्ना आकेमवाड, सुरेश हाटकर, दिनेश मोरताळे, प्रसन्नजीत वाघमारे, रुपेश यादव, धम्मा कदम, मुन्तजीब, रणजीतसिंग कामठेकर, नागोराव पा.रोशनगावकर, अरविंदसिंग संधू, केशव मोकले, प्रताप देशमुख बारडकर, उत्तमराव लोमटे, आदिंची उपस्थिती होती.
——————————————— **** ———————————————
शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर कधी बोलणार
ना.अशोकराव चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारची कृषी व कामगार विधेयके शेतकरी कामगारांच्या विरोधात आहेत. याबाबत एक शब्द तरी बोलता का? यांना शेतकरी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही तर अवैध धंदे व क्लबचे पडले आहे. असा टोला नाव न घेता खा. प्रताप पा.चिखलीकर यांना लगावला आहे.
——————————————— **