नाफेड तर्फे हमी भावाने शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी अॉनलाईन नोंदणी करावी — आमदार श्यामसुंदरजी शिंदे

कंधार ;दिगांबर वाघमारे

नाफेड तर्फे हंगाम २०२०-२१ मध्ये
किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सोयाबीन सह शेती माल खरेदीसाठी दि.१ अॉक्टोबर २०२० पासून मालाची अॉनलाईन नोंदणी  सुरु करण्यात आली असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे  सोयाबीन शासनाच्या ठरवून दिलेल्या हमी भावाने विक्री सुरू होणार असल्याने कंधार लोहा मतदार संघातील सर्वच शेतकरी बांधवानी तात्काळ अॉनलाईन नोंदणी करावी असे आवाहन लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे  यांनी केले आहे.

दि.१अॉक्टोबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीने  शेतीमाल अॉनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.सदर नोंदणी झालेल्या शेतीमालाची दि.१५ अॉक्टोबर २०२० पासून शासनाच्या रास्त हमी भावाने खरेदी होणार आहे.

यामध्ये उडीद -सहा हजार रुपये,मुग – ७ हजार१९६ रुपये  ,सोयाबीन -३ हजार ८८० रुपये,तर ज्वारी २ हजार ६२० रुपये हमी भावाने खरेदी केली जाणार आहे.

या
अॉनलाईन नोंदणी करिता शेतक-यांचे आधारकार्ड, पीकपेरा असलेला ऑनलाईन ७/१२,
बँक पासबूक ही कागदपत्रे घेऊन कागदपत्रे स्कॅन करून नोंदणी करण्यात यावी.तसेच शासनाने
दिलेल्या कालावधीमध्ये नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज अॉनलाईन झालेल्या अर्जाची नोंदणी त्याच दिवशी अपडेट होणार आहे.त्यामुळे कंधार लोहा मतदार संघातील एकही शेतकरी या हमी भाव विक्री पासून वंचीत राहू नये म्हणून कंधार लोहा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी  वरील आवश्यक ते कागदपत्र अॉनलाईन करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे व समस्त कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *