सदिच्छा भेटीतून गुरुजनांच्या पाठीवर थाप
लोहा ; विनोद महाबळे
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पार्डी येथे लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता,रंगरंगोटी, स्वच्छते बद्दल समाधान व्यक्त करून पार्डी येथील शाळेचा इतरांनी आदर्श घ्यावा असे नमूद केले.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव कमावलेली अशी जिल्हा परिषद एकमेव शाळा असल्याचे यापूर्वी अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी स्तूती सुमने उधळलेली आहेत.
पारडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक बाबींबरोबरच संस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपले नाव लौकिक करून शाळेबरोबरच गावाची मान उंचावण्याचे काम केलेले आहे. याचे सर्व श्रेय शाळेचे मुख्याध्यापक किसवे सर, सर्व स्टाफ यांना गावकऱ्यांनी दिलेले आहे. त्यांना जोड दिली लोहाचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के साहेब यांनी हे कदापि विसरता येणार नाही.विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व, गुणवत्ता निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी अतोनात असे कष्ट घेतलेले आहेत. याच शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका जिल्हा स्तरावरून राज्य पातळीवरही आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे काम यांनी केलेले आहे.
क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.शाळेच्या वेळे व्यतिरिक्त तन-मन प्रसंगी धनाने सुद्धा पालकांच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षकांच्या प्रेरणेने, गावकऱ्यांच्या सहकार्याने येथील अनेक विद्यार्थी नामवंत शाळेच्या विद्यार्थ्यांना लाजण्याचे भाग्य लाभले. याची दखल यापूर्वी जिल्हा शिक्षणाधिकारी,जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासहित जिल्हाधिकारी यांनी घेतलीच आहे.
सदरील जिल्हा परिषद शाळेने रंगरंगोटी द्वारे निसर्गचित्रण, विविध ऐतिहासिक वारसा संपन्न तेचे दाखले,वैज्ञानिक, संस्कृतिक महाराष्ट्राचे दर्शन, भारत देशाची एकात्मता, जागरूकता,व्यसनमुक्ती आदींचे चित्रण रंगरंगोटी द्वारे दाखवून दिले आहे. शाळेतील रंगरंगोटी च्या कामाचे सूक्ष्म व बारकाईने निरीक्षण करून आज लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार परळीकर यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोरोनाला हरवून नव्या उत्साहाने काम करणारे शिक्षणविस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे, केंद्रप्रमुख बाबुराव फसमले, अध्यक्ष विठ्ठल डिकले ,उपाध्यक्ष बळीराम पवार, सरपंच राम पवार उपसरपंच प्रतिनिधी शरद पवार, सर्व सन्माननीय सदस्य शाळेचे शिक्षक, आजी-माजी पदाधिकारी व गावकरी यांनी सामाजिक अंतर ठेवून उपस्थिती दर्शविली.