अण्णाभाऊंच्या जीवनावरील नाटक अतिशय प्रत्ययकारी – डॉ. सुरेश सावंत
नांदेड; उदय नरवाडे
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर राहुल जोंधळे यांनी लिहिलेले नाटक अतिशय सक्षम आणि प्रत्येयकरी आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी काढले आहेत. राहुल जोंधळे लिखित “मृत्यूकडून जीवनाकडे” या नाटकाचा प्रकाशन सोहळा डॉ. सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र गोणारकर हे होते तर प्रा. माया भालेराव श्याम कांबळे, दै. युगांतरचे संपादक श्याम कांबळे, डॉ. विजेंद्र कांबळे, नाट्यनिर्माता ज्योतिबा हनवते, आणि प्रकाशक संजय सुरनर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉक्टर सावंत पुढे बोलताना म्हणाले की एखाद्या महापुरुषांच्या जीवन आणि कार्य नाटकाच्या माध्यमातून उभ करणं आणि त्याला रंगमंचावर साकार करणं हे नाटककरासाठी एक अवघड आव्हान असतं परंतु राहुल जोंधळे यांनी आपल्या “मृत्युकडून जीवनाकडे” या दोन अंकी नाटकात हे आव्हान लीलया पेलली आहे.
याप्रसंगी डॉ. राजेंद्र गोणारकर म्हणाले की, अण्णाभाऊंच्या जीवनावरील नाटक गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे याला विशेष महत्त्व आहे. डॉ. गणारकर यांनी यावेळी हाथरसच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला
आरंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दै. युगांतर या वृत्तपत्राचे संपादक श्याम कांबळे यांनी केले नाटकाचे लेखक राहुल जोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या ह्या आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्याला ह्या नाटकातील सर्व कलावंत आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण करण्यात आले.