मातोश्री प्रतिष्ठानच्या अमित शेळकेची बाटा कंपनीत प्लेसमेंट
नांदेड :
एमबीए, इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकचे दर्जेदार शिक्षण देऊन सर्वप्रथम आयएसओ व नँक मानांकन मिळवणाऱ्या मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इंन्स्टिट्युशन्स मधील स्कुल ऑफ मँनेजमेंटचा विद्यार्थी अमित शेळके फुटवेअर क्षेत्रातील जगप्रसिध्द बाटा या भारतीय कंपनी प्रोडक्शन लाईन मँनेजर या सन्मानजनक हुद्द्यावर निवड झाली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या आईवडीलांसोबत मातोश्री प्रतिष्ठान स्कुल ऑफ मँनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. ओमप्रकाश शर्मा, विभागप्रमुख प्रा. सदानंद शिंदे, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफिसर इंजि. असद हाश्मी, प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्रा. प्रियंका एडके व व्यक्तिमत्त्व विकास आणि संभाषण कौशल्य शिबीर राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या मातोश्री इंन्क्युबेशन सेंटरच्या संपूर्ण टिमला दिले आहे.
भारताबाहेरही असंख्य देशात लेदर फुटवेअर कार्यक्षेत्रात अग्रगण्य असणारी बाटा या कंपनी अंतर्गत अधिकारी पदावर कार्य करण्याची संधी ग्रामीण भागातील अमित शेळके याने पटकावून मातोश्री प्रतिष्ठानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शंभर टक्के प्लेसमेंटचे ध्येय दरवर्षी गाठणाऱ्या मातोश्री प्रतिष्ठानच्या उद्दिष्टपुर्तीच्या समाप्तीकडे दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे अशी प्रतिक्रिया संस्थेचे सचिव व्ही. व्यंकट चारी यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील एमबीएमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना अमित शेळके म्हणाला की, प्राध्यापकांनी दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करत पहिल्या दिवसापासून सातत्यपूर्ण अभ्यास केला आणि कॉलेजमध्ये राबविलेल्या सर्टिफिकेट व ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सक्रिय सहभाग घेतला तर हवे असलेले यश पदरात पाडून घेणे अवघड नाही. इंग्रजीची अनाठायी भिती मनातून काढून टाकली आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या मातोश्री इंन्क्युबेशन सेंटरच्या ट्रेनिंग मन लावून केल्या तर जग जिंकण्यासाठी कुणीही सुसज्ज होऊ शकतो. अमित शेळकेच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कामाजी पवार, व्यवस्थापकीय संचालक अरविंद पाटील, उपाध्यक्ष अलका सातेलीकर, सहसचिव विमल सिरसाट, कोषाध्यक्ष सतिष शिंदे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.