नांदेड :
जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची नुकतीच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्राउंड पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या, जिल्हापरिषद सदस्या म्हणून प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची वेगळी ओळख आहे. खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यातील तिन चार विधानसभा क्षेत्रात जाऊन प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेवून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांनी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.या निवडीबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,
महानगराध्यक्ष प्रवीण साले, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर ,माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार डी.बी .पाटील, माजी मंत्री
माधवराव पाटील किन्हाळकर, माजी
आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी आदींनी या निवडीचे स्वागत केले आहे. दरम्यान
प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांची
औरंगाबाद भाजपच्या शहर महिला मोर्चा प्रभारी म्हणूनही निवड करण्यात आली.