सामुहिक बलात्काराची क्रुर मानसिकता

              हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्काराची घटना ताजीच असतांना उत्तर प्रदेशमध्ये आणखी एका तरुणीचा सामुहिक बलात्कार केल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलरामपूरात एका बावीस वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. नराधमांनी त्या तरुणीचे दोन्ही पाय आणि पाठ मोडली आहे. यानंतर त्यांनी त्या तरुणीला रिक्षात टाकून घरी पाठवले. घरी पोहचताच तिचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पीडितेच्या कुटुंबियांनी दिली आहे. पोलीसांनी या प्रकरणी दोन नराधमांना अटक केले असून, संपुर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैन्यात करण्यात आला आहे.
पीडितेच्या आईला असे सांगितले आहे की, नराधमांनी मुलीला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. व त्यांनतर तिला मारहाण केली असून, तिला रिक्षातून घरी पाठवण्यात आले. नराधमांनी तिला इतकी मारहाण केली होती की, तिला बोलता सुद्धा येत नव्हते. घरी आल्यावर तिने मला खुप वेदना होत आहेत. आता मी वाचणार नाही असं पीडितेने आपल्या आईला सांगितलं होतं. बलरामपूरचे एसपी देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, पीडितेच्या आईने केलेले सर्व दावे खोटे आहे. तसेत त्या पीडितेची पाय आणि पाठ मोडली गेलेली नाही. सदरील तरुणीचा शवविच्छेदन केले असता त्यात असा कोणताही प्रकार आढळला नसल्याचं वर्मा यांनी सांगितले आहे.
कोरोना घेऊन उगवलेल्या सन  २०२० या वर्षात सामुहिक बलात्काराच्या देशात प्रत्येक महिन्याला एक दोन घटना घडलेल्याच आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी नामक दलित मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणानंतर देशभरातील समाजमन पेटून उठले आहे. परंतु देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रही काही धुतल्या तांदळाचा नाही.  महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये तर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा २१ टक्क्यांनी वाढला आहे. ‘पोक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफन्सेस) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात दहावा क्रमांक आहे. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०१९ साली नागपुरात ‘पोक्सो’ अंतर्गत एकूण २३१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची संख्या १११ इतकी होती. तर ११७ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आले. २०१८ मध्ये अत्याचाराचा आकडा ९१ इतका होता. तर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्ह्यांची संख्या १९५ इतकी होती.

मागील तीन वर्षांत नागपुरात महिलांविरोधात झालेल्या विविध गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. २०१९ मध्ये १ हजार १४४ प्रकरणे दाखल करण्यात आली व १ हजार १५५ महिलांना विविधप्रकारे अन्यायाचा सामना करावा लागला. यात लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचे २२२ गुन्हे, अपहरणाच्या ४०५ तर पती किंवा सासरच्यांकडून क्रूरतापूर्ण वागणुकीच्या १३६ गुन्ह्यांचा समावेश होता.

मध्य प्रदेशच्या नरसिंहपुरमध्ये हाथरससारखाच प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेवर सामुहिक बलात्कार  झाला. मात्र, चार दिवसांपासून प्रयत्न करूनही पोलिसांनी एफआय़आर दाखल करून घेतला नाही. कुटुंबासोबत रोज पिडीता पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली. उलट पोलिसांनी तिला शिवीगाळ करत पैसे मागितले. अखेर पिडीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा  धक्कादायक प्रकार घडला आहे.  

या प्रकरणाने वाद निर्माण होताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने एएसपी आणि एसडीओपींची उचलबांगडी केली आहे. याशिवाय एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. २८ सप्टेंबरचे हे प्रकरण आहे. रिछाई गावात राहणाऱी महिला शेतात चारा कापण्यासाठी गेली होती. तेव्हा शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी शेतातच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पिडीता आणि तिचे कुटुंबीय गोटिटोरिया आणि चिचली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी सारखे जात होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही. पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या पिडीतेने घरातच फास लावून घेतला. 

        हरियाणातील पानीपत येथे एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. दोन जणांनी मिळून पीडित विद्यार्थीनीचं अपहरण केलं आणि त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन बेशुद्धावस्थेत अज्ञातस्थळी सोडून पळ काढला. पीडित मुलगी ही ११वीची विद्यार्थीनी आहे. ही मुलगी ट्यूशनसाठी गेली होती आणि संध्याकाळी सहा वाजता ट्यूशन संपल्यावर घरी न पोहोचल्याने घरातील सदस्यांनी तिचा शोध सुरु केला. बराचवेळ शोध घेतल्यानंतरही मुलगी न सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना यावर्षी जानेवारीत घडली.
पोलिसांत तक्रार केल्यानंतर काही वेळाने कुटुंबियांना माहिती मिळाली की त्यांची मुलगी एका ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका आरोपीने पीडित मुलीला कॉल करुन पार्कमध्ये बोलवलं होतं. हा आरोपी पार्कमध्ये बसून आपल्या दुसऱ्या मित्रासोबत दारू पित होता. ज्यावेळी ही मुलगी पार्कमध्ये पोहोचली तेव्हा आरोपींनी तिला दारू ऑफर केली. यानंतर आरोपींनी तिला दारू पाजली आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली. याचाच फायदा आरोपींनी घेतला. 
आरोपींनी तिला आपल्यासोबत कारमध्ये नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला पार्किंग परिसरात सोडलं ज्या ठिकाणी तिची स्कूटी होती. या घटनेप्रकरणी पानीपत पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३३ वर्षीय महिला हे लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ लघुशंकेसाठी जात असताना चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. पीडित महिला ३३ वर्षीय असून जानेवारी महिन्यातल्या सोमवारच्या त्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही महिला लघुशंकेसाठी एका झुडपाच्या जवळ थांबली. त्यावेळी तेथून जाणाऱ्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्याच ठिकाणाहून जाणाऱ्या अन्य दोघांनीही त्या महिलेवर बलात्कार केला.

आरोपींनी या महिलेकडे असलेले तीन हजार रुपये आणि मंगळसूत्र सुद्धा चोरले. पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथून जाणाऱ्या एका महिलेने या पीडित महिलेची मदत करत पोलिसांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तात्काळ पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आरोपी सुद्धा तेथेच उपस्थित होते. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक केली. मुंबईसारख्या शहरात अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. 

मुंबईमध्ये सामूहिक बलात्कार करुन तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ७ फेब्रुवारीला समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ठाण्यातून अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. तरुणीच्या शेजारीच राहणाऱ्या दोन तरुणांनी हे कृत्य केले होते. याप्रकरणामुळे सांताक्रुझ परिसर हादरला होता.

        उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये भाजपचे आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाराणसीतील एका पीडित महिलेने आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यावर विधानसभा निवडणुकी दरम्यान हॉटेलवर बोलावून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. १० फेब्रुवारी रोजी महिलेने आमदारावर हे आरोप केले होते.
आमदार त्रिपाठी यांचा भाचा संदीप तिवारीने लग्नाचे वचन दिले होते. त्यानंतर त्याने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने असेच आरोप आमदार आणि त्यांच्या मुलावरही केले आहेत, असं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, हे सर्व आरोप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांनी फेटाळून लावले होते. 

तामिळनाडू मध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नातेवाईकांसह १६ जणांनी एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. चेन्नई मधील एका आठ वर्षांच्या मुलीवर २०१७ पासून काही नातेवाईक आणि इतर लोक बलात्कार करीत होते. २०१९ साली ही घटना समोर आली. फेब्रुवारी २०२० मध्ये मुलीला पोटात त्रास सुरू झाला. शौचालयात गेल्यानंतर खूप वेळ झाला तरी ती शौचालयातून बाहेर येत नव्हती. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. 

              सामुहिक बलात्काराची एक किळसवाणी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली. इथे एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुमारे ६ महिन्यांपासून तब्बल १० जण सामूहिक बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, ही घटना एके दिवशी उघडकीस आली. मुलगी एका मंदिराच्या बाहेर बसून प्रचंड रडत होती. हे पाहून लोकांनी तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिच्याकडून त्यांना बलात्काराच्या घटनेबाबत समजलं तेव्हा त्यांनी तात्काळ याबाबत  पोलिसांना माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मुलगी खूपच घाबरली होती. मात्र, नंतर पोलिसांनी जेव्हा तिला विश्वासघात घेऊन  धीर दिला त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. दरम्यान, तिच्या तक्रारीनंतर सर्व १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यापैकी ५ जणांना अटकही करण्यात आली आहे. तर ५ आरोपी मात्र अद्यापही फरारच आहेत.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ती आरोपींपैकी काही जणांना आधीपासूनच ओळखत होती. याच लोकांनी सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला अशीही धमकी दिली की, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यानंतर, इतरही आरोपी या गुन्ह्यात सामील झाले. जे तिला सलग ६ महिने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करत होते. 

आरोपीपैकी काही जण हे ऑटो रिक्षा चालकही असल्याचं समजलं. पीडित मुलीच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ती आपल्या आईसोबतच राहत होती. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या आईवरच होती. अनेकदा कामानिमित तिची आई घराबाहेर असायची. याच गोष्टीचा फायदा घेऊन सुरुवातीला आरोपींनी मुलीला भुलवून तिच्यावर बलात्कार केला.  याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपींविरुद्ध  सामूहिक बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
झारखंडमधील खूंटी जिल्ह्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल तीसहून अधिक वेळ  सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  समोर आली. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. पीडिताचा असा आरोप आहे की, १० ते १२ मुलांनी तीन महिन्यात जवळजवळ २५ ते ३०  वेळा तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. 


२४ फेब्रुवारीला पीडितेला जेव्हा चाइल्ड वेलफेयर कमिटीच्या समोर आणण्यात आलं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. चायल्ड वेलफेयर कमिटी (सीडब्ल्यूसी) ने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला घटनेची नेमकी तारीख आठवत नाही. पीडिता जेव्हा एकदा बाजारात गेली होती तेव्हा बजरंग नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली होती आणि नंतर पुढे त्यांची मैत्री झाली. त्याच्यासोबत त्याचा मित्र सूरज देखील होता. याचवेळी बातचीत करत ते दोघेही तिला आपल्या बाइकवरुन सिंबुकेल या गावी नेलं. यानंतर दोघं मित्र हडिया (एक प्रकारचं अंमली पेय) प्यायले आणि त्यांनी मुलीचा मोबाइल खेचून घेतला. आणि नंतर त्यांनी पुन्हा तिला बाजारात आणून सोडलं.

आरोप आहे की, जेव्हा पीडिता बजरंगला फोन करुन आपला मोबाईल परत मागायची, तेव्हा तो तिला बोलवून एखाद्या निर्जन स्थळी घेऊन जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर इतर अनेक मुलं असायची. विरोध केल्यानंतर ते तिले जीवे मारण्याची धमकी द्यायचे. हा संपूर्ण प्रकार जवळजवळ तीन महिने सुरु होता. अखेर चाइल्ड वेलफेयर कमिटीच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. 

मुलीची वैद्यकीय चाचणी आणि समुपदेशन सुरु करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.

उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. येथे होळीला रंग लावण्याच्या बहाण्यानं चार तरुणांनी एक तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार, रंग लावण्याच्या बहाण्यानं चार आरोपी घरात घुसले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीनं आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे लोकं आले. लोकं आल्याचं बघून आरोपी तिथून फरार झाले. घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखपूर जिल्ह्याच्या गीडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एका गावातली आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी होळीच्या दरम्यान गावात डीजे सुरु होता. त्यावेळी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चार तरुण रंग लावण्याच्या बहाण्यानं १९ वर्षीय तरुणीच्या घरात घुसले. तरुणीला घरात एकटे पाहिल्यावर तिला तिच्या घरातल्या एका खोलीत खेचत घेऊन गेले आणि तिच्यावर एकामागोमाग एकानं सामूहिक बलात्कार केला. त्याच दरम्यान पीडित तरुणीची आई घरी पोहोचली. आईनं मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर ती खोलीच्या बाहेर गेली. बंद खोली बघून पीडित मुलीच्या आईनं आरडाओरड केली.


 ग्रामस्थ जेव्हा तिच्या घरी पोहोचणार तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाले होते. पीडित तरुणीनं झालेल्या सर्व प्रकार आपल्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर तिचे कुटुंबिय तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार, एफआयआर दाखल करत माजी गावप्रमुखाचा मुलगा सूर्यभान, सिंटू, केशा आणि मोनू यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला. यावरुन सूर्यभानला पोलिसांनी अटक केली. 

मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोघा  आरोपींवर बलात्कार आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणीवर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बलात्कार झाल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्ती दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळाली. 

 मिरज रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास  १९ वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मागील काही दिवसापासून मिरजमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती. बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वत्र संचारबंदी सुरु असताना आणि सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा असताना मोकळ्या जागेत बलात्काराच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती. घरगुती हिंसाचार, अत्याचार किंवा मानसिक छळ सहन करावा लागणाऱ्या महिलांना मदतीसाठी  १०० हा हेल्पलाइन नंबर असल्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करुन दिली होती.

 राजस्थानच्या बाडमेर शहरात दोन सख्ख्या बहिणींसोबत सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन बहिणींवर त्यांचा शेजाऱ्यानेच वारंवार बलात्कार केला होता. दोन्ही बहिणी या अल्पवयीन असून त्यांच्यातील एकीचे वय १७ आणि दुसरीचं वय १५ वर्ष आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस येताच आरोपींनी पळ काढला आहे. तनवीर माळी आणि नरेश दिशांतारी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीने शेजारी असल्याचा फायदा घेत एका महिलेच्या मदतीने दोन बहिणींवर वारंवार अत्याचार केले. आरोपींनी पीडितांचे अश्लील फोटोही काढून ते सोशल मीडियावर शेअर देखील केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा पीडित मुलींचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोन्ही बहिणी शाळेत जात असताना आरोपी त्यांची छेड काढायचे. हा संपूर्ण प्रकार अनेक दिवस सुरु होता. या कारणास्तव कुटुंबातील सदस्यांनी दोन्ही बहिणींचं शाळेत जाणं देखील बंद केलं होतं. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय चाचणी करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतला.  
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक पुष्पेंद्र आढा म्हणाले होते की, ‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी केली असून तपास देखील सुरू केला आहे. त्याचवेळी आरोपींना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून पोलिसांनी पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आणि तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. हे प्रकरण बैतूल शहरातील आहे. एक अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होता, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कारा झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,३ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेअकराच्या सुमारास एक चौदा वर्षीय अल्पवयीन अचानक घरातून गायब झाली. दुसर्‍या दिवशी तिच्या कुटूंबाने मिसिंग तक्रार चार ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविला, त्यावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि त्या अल्पवयीन मुलाचा शोध सुरू केला.  ती अल्पवयीन पाच ऑगस्ट रोजी तिच्या घरी पोहचली, तिने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, तीन ऑगस्टच्या रात्री एका परिचित महिलेच्या घरी थांबली आणि चार ऑगस्ट रोजी दिवसा फिरत होती. 

४- ५ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री पाच मुलांनी तिच्यावर रेल्वेच्या ओव्हरब्रिज आणि सदर भागाजवळील झोपडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. यानंतर पोलिसांनी गँगरेपसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून संशयाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे सत्य देखील समोर येत आहे की, आरोपीने पीडितेला आधी दारू पाजली, नंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसही या वस्तुस्थितीचा तपास करत आहेत. घटनेचे कोणतेही पैलू तपासात शिल्लक राहू नये यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांकडूनही या मुलीची चौकशी केली गेली. 
महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच तालुक्यातील गोदाम पट्ट्यात असलेल्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील पायवाटेने रात्री आपल्या मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून घरी परतणाऱ्या ४२ वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून महिलेस जखमी करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात रविवारी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताच अवघ्या काही तासांतच नारपोली पोलिसांनी यातील चार नराधमांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. 
भिवंडी शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला असून तेथे मजुरी कामासाठी हजारो स्त्री पुरुष येत असतात लॉक डाऊन काळात काम नसल्याने नव्या कामाच्या शोधत एक ४२ वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रीणीकडे नव्या कामाच्या चौकशी साठी सायंकाळी गेली असता तेथून रात्री उशिरा ती एकटीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारील मुनिसुरत कंपाऊंड येथील झाडाझुडपाच्या आडवाटेने आपल्या घरी जात असताना रस्त्यात मद्यपी पाच युवकांच्या टोळक्याने महिलेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केले .अत्याचारग्रस्त महिला बेशुद्धावस्थेत त्याच ठिकाणी पडून होती .दुसऱ्या दिवशी या महिलेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर पोलिसांनी अज्ञात अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करीत जखमी  महिलेस ठाणे येथील कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. 
 या अत्याचाराची नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासातच या घटनेतील नराधम आरोपी माँटी कैलास वरटे ( वय २५ वर्षे ) विशाल कैलास वरटे ( वय २३ वर्ष दोघे राहणार भिवंडी ), कुमार डाकू राठोड ( २५,  रा.पुर्णा ) अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता ( २८ ) यांना ताब्यात घेऊन नारपोली पोलीस स्टेशन येथे भादवि कलम  ३७६ (ड), ३४१, ३२४, ३२३ प्रमाणे अटक केली असून त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. 

 उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे एका महिलेने असा आरोप केला आहे की, गावातील चार मुलांनी जबरदस्तीने दारू प्यायला घातली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती परत तिच्या सासरच्या घरी जात असताना ही घटना घडली. सासरी जात असताना तेवढ्यातच गावातील चार मुले तिच्या मागे गेली आणि तिला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलिसातसामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोंडाच्या खोदरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी या महिलेचा आरोप आहे की, गावातील चार जणांनी तिच्यावर दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी जात होती. या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेची माहिती देताना सांगितले की, एक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे.

गावातील चार मुलांनी तिच्यावर दुष्कृत्य केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ती आपल्या मेव्हण्याच्या घरी परत येत होती, मग ती सासूच्या घरी बसून मुलांसमवेत खेळू लागली. त्याचवेळी चार मुले माझ्यामागे आली. मला जबरदस्तीने उसाच्या मळ्यात नेऊन बलात्कार केला. सामूहिक बलात्काराची नव्हे तर बलात्काराची तक्रार प्राप्त असल्याचे पोलिसांनी सांगितले
गोंडचे एसपी शैलेंद्र पांडे यांच्या म्हणण्यानुसार सामूहिक बलात्कार नव्हे तर केवळ बलात्काराचे प्रकरण त्यांच्याकडे आले. मनकापुर पोलिस ठाण्यातून पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आरोपीला अटक केली. या महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू होता.


 अलवर जिल्ह्यात एका ४५ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनीही या दुष्कृत्याचे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला. गुरुवारी (१७ सप्टेंबर) रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हा एक विवाहित महिला आपल्या पुतण्यासोबत कोणालातरी पैसे उधारीवर देण्यासाठी जात होती. जेव्हा ते पैसे देऊन परतत होते, तेव्हा डोंगरावर त्यांना सहा जणांनी थांबवले, असे डीएसपी, तिजारा यांनी सांगितले. 
“त्यांनी महिलेशी गैरवर्तन केले आणि तिच्या पुतण्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना पळवून नेले, त्यानंतर एका व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला तर काहींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनी या दुष्कृत्याचा एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला. पीडित महिलेने घडलेला प्रकार नवऱ्याला सांगितला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. सहा आरोपींपैकी दोघांना  अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील बैतूलचीच आणखी एक घटना.  जिल्ह्यात एका १८ वर्षीय तरूणीवर आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे ४ तास आरोपी त्याच्यावर बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे. २१ वर्षीय भाऊ मदतीसाठी ओरडत होता. पण जंगलात कोणीही मदत केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरूणी आपल्या भावासह रात्री आठ वाजता बाईकवर पेट्रोल भरून घरी जात होती. बैतूलचे एसपी डीएस भदौरिया यांनी सांगितले की आरोपींनी दोघांना ८ वाजता घेरले. 

मिळालेल्या माहितीनुसार रात्री घरी जाताना बाईकचा हेडलाइट खराब झाली. ती दुरूस्त करत असताना इतर ३ मोटारसायकलवरून ७ जण पोहचले. तरूणी आणि तिच्या भावाला बाईकवर बसवून जंगलात घेऊन गेले. भावाला मारहाण केली. तसेच त्याला विहिरीत फेकले. तर तरूणीसोबत आरोपींनी पीसाजोडी जंगलात सामूहिक बलात्कार केला. रेपनंतर आरोपी तरूणीला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होते. भाऊ कसा तरी विहिरीतून बाहेर आला. घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर लोक घटना स्थळी पोहचले आणि ५ आरोपींना पकडले. तर दोन जण अजून फरार आहेत.

उत्तर प्रदेशमधील बलिया शहरात सामूहिक बलात्काराची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काही नराधम आरोपींनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ शूट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल  केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि त्यानंतर पोलिसांनी आपली कारवाई सुरु केली आहे. व्हायरल व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या हाती लागला तेव्हा पोलिसांनी  तातडीने याप्रकरणातील नराधम आरोपींचा शोध सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या गँगरेपचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा तसेच आयटी कायद्यातील संबंधित कलमांखाली आरोपी तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यात येत असून लवकरच पीडितेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 
सामूहिक बलात्काराच्या वेळी पीडित मुलगी त्यांना बरीच  विनवणी करीत होती. परंतु नराधम आरोपींनी तिच्या विनवणीकडे अजिबात लक्ष दिले नाही. यावेळी या आरोपींनी तिचं काहीही म्हणणं न ऐकता सुरुवातीला तिला बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडिओनुसार, अनेक मुलांनी एकट्या मुलीला एका निर्जन स्थळी गाठून तिलं घेरलं. त्यानंतर त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला.

पीडित मुलगी आपली सुटका व्हावी यासाठी त्यांच्यासमोर अक्षरश: भीक मागत होती. आपली इज्जत लुटू नका अशी विनवणी ती करत होती. पण मुलीच्या बोलण्याचा या नराधमांवर काहीही फरक पडत नव्हता. त्यांनी सुरुवातीला तिला मारहाण करुन नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी आता केली जात आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासंबंधी योगी सरकारवर आत्ताच्या सारखाच(?)  दबाव असल्याचे समजले होते. 

या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या घटना आहेत. यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आणि देशभरात वेगवेगळ्या राज्यात घडलेल्या आहेत. अजूनही घडतच आहेत. लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सर्व कायदे असूनही अशा घटनांना आळा बसलेला दिसत नाही.  ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही नसते. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना नित्याच्याच होत्या. कोव्हिड सेंटरमध्येही बलात्कार झाले. लैंगिक शोषणाच्या अनेक घटना लाॅकडाऊनमध्ये घडलेल्या समोर आल्या आहेत. लैंगिक अत्याचाराचा धर्म, जात, वंश, प्रांतनिहाय नसतो. तो केवळ प्रादेशिक नसतो. देशात महिला सुरक्षा हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पेटून उठला आहे. रोज म्हटलं तरी महिला अत्याचाराच्या आणि लैंगिक छळाच्या घटना देशात समोर येत आहेत. कुठल्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाही हे वेळीवेळी समोर आलं आहे. महिला अत्याचाराची एखादी घटना समोर आली की, ज्यावर जातीचं राजकारण, कँडल मार्च आणि न्यायासाठी आंदोलन झाल्याचं पाहिलं. पण यातून अत्याचार थांबतील का? हा खरा प्रश्न आहे. 
महिला अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या देशातील महिलांना शारिरीकदृष्ट्या सक्षम करणं महत्त्वाचं आहे. त्यांना लहानपणापासून शारिरीक व्यायाम, कराटेसारख्या शैली अवगत असल्या पाहिजे. यासाठी महिलांना शालेय शिक्षणातच या सगळ्याचे धडे देणं महत्त्वाचं आहे. पण यावर राजकारणापलीकडे कोणतीही ठोस पाऊलं उचललं गेलं नाही. पण अशात ऑनलाईनच्या विश्वात महिला सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे आणि उपयोगी अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत.
महिलांवर कुठलाही अतिप्रसंग आला तर महिलेच्या हातात असं शस्त्र हवं ज्याने त्या नराधमांना सडेतोड उत्तर देतील. त्यामुळे मोबाईलमध्ये असे काही अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत ज्याने महिलांना सुरक्षेसाठी मदत करता येईल. 
एक : सफेटिपिन अ‍ॅप (Safetypin App) हा अ‍ॅप खास महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून GPS ट्रॅकिंग, इर्मजन्सी फोन नंबर आणि सुरक्षित लोकेशन असे फिचर्स देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त यूजर्स अ‍ॅपमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित जागांची माहिती मिळवू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेचा समावेश आहे.  दोन : हिंमत प्लस अ‍ॅप (Himmat Plus App)दिल्ली पोलिसांनी हा अ‍ॅप खास महिलांसाठी तयार केला आहे. या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी यूजर्सला सगळ्यात आधी दिल्ली पोलिसांच्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर वापरकर्त्यांना यामध्ये एसओएस बटनाची सुविधा उपलब्ध होते. ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत यूजर लोकेशन, ऑडिओ आणि व्हिडिओ थेट पोलीस कंट्रोल रूमला पाठवू शकतो.


           तिसरा अॅप आहे, वूमन सेफ्टी अ‍ॅप (Women Safety App). या अ‍ॅपचं खास वैशिष्ट्य म्हणजे यूजरच्या आवाजाचा 45 सेकंदाचा मेसेज, व्हिडिओ आणि लोकशन आपत्कालीन नंबरवर पाठवला जाऊ शकतो. ज्याने तात्काळ मदत पोहोचवण्यास शक्य होतं. चार : बीसेफ अ‍ॅप (Bsafe App)या अ‍ॅपचा वापर तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी करू शकता. यामध्ये तुम्हाला एसओएस आणि लोकेशन शेअरिंगसारखे फिचर मिळतील. ज्याचा उपयोग तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये करणं शक्य होईल. पाचवा आहे.  शेक टू सेफ्टी अ‍ॅप (Shake To Safety App)

महिलांच्या सुरक्षेसाठी हे अ‍ॅप अतिशय महत्त्वाचे आहेत.  यामध्ये कुठलाही महत्त्वाचा मेसेज पाठवण्यासाठी फक्त फोनला हलवून किंवा पॉवर बटनला चार वेळा दाबून आधीच ठरवल्या गेलेल्या नंबरवर पाठवला जाऊ शकतो. फक्त फोनला हलवूनदेखील महत्त्वाचा मेसेज पाठवला जाऊ शकतो हेच या अ‍ॅपचं खास वैशिष्ट्य आहे.
दोन दिवसांपूर्वीच गांधी जयंती झाली. आणि त्याच दिवशी अत्याचाराच्या अनेक घटना चव्हाट्यावर आल्या. मोहनदास करमचंद गांधी….यांना अवघे जग महात्मा गांधी या नावाने ओळखते. आजच्या जगात गुन्हेगारी एवढी वाढली आहे की, बापूंचे विचार समजून त्याचे आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. यावर आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू काय सांगतात माहित आहे? एका पत्रात महात्मा गांधी यांनी हा सल्ला दिला आहे. 

महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार स्पष्ट होते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते.  

द माइंड ऑफ महात्‍मा गांधी’ पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. रावणाने सीतेचे मन अनेक प्रलोभने देऊन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर आग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे. 
एका महिलेने बापुजींना तीन प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. म. गांधीजींनी  १९४२ मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ”ज्या महिलेवर बल्ताकाराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी बापू म्हणाले होते. 


 हाथरसमधील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात दिवसाला सरासरी ८७ बलात्काराच्या घटना घडत असून महिला असुरक्षिततेच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागने (NCRB) दिली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील वर्षी महिलांवरील अत्याचाराचे एकूण चार लाख पाच हजार गुन्हे नोंदवले गेले. तर २०१८ च्या तुलनेत २०१९  मध्ये महिला अत्याचाराच्या प्रमाणात तब्बल ७.३ टक्क्यांनी वाढ झाली. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर एक लाख महिलांमागे ११७ महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तसेच प्रतिलाख महिलांमागील अत्याचाराच्या घटनात आसाम सर्वात वरच्या स्थानावर आहे.
देशात सर्वाधिक गुन्हे हे भारतीय दंड संहितेअंतर्गत नोंदवले गेले. तीस टक्के गुन्ह्यांत महिलांवर घरच्या नातेवाईकांनीच लैंगिक अत्याचार केले. तर २१.८ टक्के गुन्ह्यांत महिलांवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. १७.९ गुन्ह्यांत महिलांचे अपहरण करण्यात आले. तर ७.९ टक्के महिलांवर बलात्कार झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी सांगते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या ताज्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. 

राजस्थामध्ये एकूण ५९९७ बलात्काराचे गुन्हे घडले असून हे प्रमाण १५.९ टक्के आहे. तर १०० टक्के सुसिक्षित म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये प्रति १ लाख महिलांमागे ११ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. महिला सामाजिक तिरस्कार, प्रतिष्ठेच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे महिला अत्याचारांचा हा आकडा यापेक्षाही मोठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनांवर बोलणारे आणि वादग्रस्त विधानेही करणारे अनेक महाभाग आहेत. पण या घटनांना पायबंद घालू शकणारे ना कायदे आहेत ना माणसे आहेत. अनादिकालापासून महिलांवर अत्याचार होतच आहेत. माणसातला जनावर सतत जागा होत असतो. कपड्यांच्या आत एक प्राणीच असतो. एक जनावर जगत असते. जनावरांना काही नातंगोतं, जातपात काही लागत नाही. एकदाच जन्माला आलेल्या, आपल्या सोबतच वाढलेल्या दोन भिन्नलिंगी प्राण्यांमध्ये शारीरिक संग घडून येतो. तसेच जन्मदात्री मादीसोबतही हा संगं घडून येतो. मग अशाप्रकारच्या माणसांतील क्रियाप्रतिक्रियांना अत्याचाराचे रुप लाभते. पण माणसात आणि जनावरांत फरक आहे. तरीही माणसं जनावरांसारखी वागू लागली आहेत. कुणीतरी एका नेत्यानं नुकतच म्हटलं की, मुलींवर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. तर बलात्कार होणार नाहीत. योग्य ते संस्कार तर मुलामुलींवर दोघांवरही झाले पाहिजेत. ते होतातही. कोणतेही आई-वडील आपल्या पाल्यांना काही वाईट गोष्टी शिकवत नाहीत. मग ह्या बलात्काराची क्रुर मानसिकता कशी जन्माला येते? इतर देशांत बलात्काराची शिक्षा ह्या अत्यंत क्रुरपणे दिल्या जातात, पण आपल्या देशात नाही हे त्याचे कारण आहे का? अशा आरोपींचे एन्काऊंटर केले पाहिजे का? किंवा त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे किंवा गोळ्या घातल्या पाहिजे का? समाजाची मानसिकता कशी बदलता येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील!

गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय /०४.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *