कंधार प्रतिनिधी :
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वरील घटनेचा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची जीभ कापण्यात आली होती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिचा मृतदेह तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात न देता मध्यरात्री तिच्यावर अमित संस्कार करण्यात आले त्यामुळे योगी सरकार विषय ही संताप व्यक्त करण्यात आला त्याच बरोबर या घटनेचा नांदेड येथे शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत भारत देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे वरील घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी .
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून एक कोटी रु द्यावेत व पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली उत्तर प्रदेशातील पोलिस प्रशासन व येथील सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे पीडित मुलीचे कुटुंबीयावर मजुरी व दडपशाही चालू आहे भारत देशात आजही लोकशाही जिवंत असताना देखील उत्तर प्रदेशातील हाथरस मधील घटनाही देशाची लोकशाही व माणुसकीला काळिमा फासणारे घटना आहे देशात दलित व वंचित नागरिक अगोदरच असुरक्षिततेच्या भावनेने जगत असताना अशा प्रकारच्या घटना त्यांचे असुरक्षिततेच्या भावनेतून वाढ होत आहे.
एवढी गंभीर घटना घडली असतानादेखील उत्तर प्रदेश मधील सरकार व पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे व पीडित मुलीच्या कुटुंबावर त्यांची मुजोरी व दडपशाही चालू आहे कालच हथरसचे जिल्हाधिकारी यांनी पीडित मुलीच्या काकांच्या छातीत लाथ मारली पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहेत पीडित मुलीचे अत्यसंस्कार देखील तिच्या कुटुंबीयांना करुदेण्यात आले नाही पीडित मुलीस वेळीच योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ती मरण पावले आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांना देखील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सातवं पर्व भेट देखील तेथील सरकार व पोलिस प्रशासन करूदेत नाहीत व त्यांना अडविण्यात येऊन त्यांनाच ताब्यात घेण्यात येत आहे .
सदरील उत्तर प्रदेश सरकारचा व पोलीस प्रशासनाचा मजुरी व दडपशाही कारभार त्वरित थांबविण्यात यावा असेही शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने राष्ट्रपतीकडे नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे व या निवेदनाच्या प्रती श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान श्री राजनाथ सिंह साहेब गृहमंत्री भगतसिंग केश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनादेखील निवेदनाच्या प्रती शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने ई-मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्हा प्रमुख यांची स्वाक्षरी आहे