एक वर्षापासून दहीकळंबा येथिल आत्महत्या ग्रस्त शिंदे कुटुंबाला न्याय मिळेना ; कुटुंब जगतय अत्यंत दारिद्र्याचे जिवन

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यक्रत्यानी जाणून घेतल्या व्यथा

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तहसील अंतर्गत असलेल्या मौजे दहिकळंबा येथिल
कै.आबाराव शिंदे दहीकळंबेकर यांनी दि .7-9-2019 रोजी सततची नापिकी, सावकारी कर्ज. खाजगी कर्ज . बॅंकेचे कर्ज, आणि मुलगी लग्नाला आली तर लग्न कसं करायचं,येवढ्या महागाईत कुठून पैसे आणायचे, आणि पहिलं असलेले कर्ज फेडायचे म्हणून सतत चिंतेत राह्याचे. त्यामुळे त्यांनी किटकनाषक औषध पिऊन आत्महत्या केली होती.

शासनाने आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांची दाखल केलेली फाईल काही अटी व शर्ती लावून म्हणजे निकषात बसत नसल्याचे दाखवून समितीने सदर फाईल अपात्र ठरविलली आहे.
बॅंकेची तुम्हाला नोटीस नाही, प्रकरण शासन निकषात बसत नाही, तुम्ही चालु बाकीदार आहात, कर्जाचा तगादा नाही, नोटीस नाही,असे दर्षवित प्रकरण अपात्र ठरविले आहे.अद्याप हे कुटुंब दारीद्र्याचे जिवण जगत आहे,या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला लोक प्रतिनिधी, किंवा कोणत्याही नेत्याने भेट दिली नाही , मात्र तरी आपले काहीतरी देने लागते म्हणून एक महिन्याचे राशन गहू,तांदूळ, साखर ,तेल,पोहे ,शेंगदाणे, मिठ ,जिरे व सर्व लागणारे साहित्य घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माधव पाटील बेटकर यांनी सदर कुटुंबास भेट दिली व व्यथा जाणून घेतली.यावेळी तालुका अध्यक्ष सुनील हराळे बाचोटीकर, संभाजी पाटील मोरे , ज्ञानेश्वर झपंलवाड,अवधुत शिंदे यासह दहीकळंबा गावकरी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *