शिवराज्य संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी भाऊसाहेब पा.चव्हाण तर उपाध्यक्ष पदी शिवाजी पा. शिंदे यांची निवड

नायगाव प्रतिनिधी :

शिवराज्य संघटनेची नायगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नायगाव तालुका कार्यकारणी स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जाहीर केली आहे नायगाव तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब पाटील चव्हाण तर उपाध्यक्षपदी शिवाजी पाटील शिंदे यांची या बैठकीत निवड करून त्यांना नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवराज्य युवा संघटनाही महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करणारे संघटना म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेल्या शिवराज्य युवा संघटनेची नायगाव तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रमुख उपस्थिती विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले शिवराज्य संघटना एक मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात चांगले काम करत असल्यामुळे नायगाव तालुक्यात समाज प्रती तळमळ असलेले भाऊसाहेब पाटील चव्हाण शिवाजी पाटील शिंदे समाजासाठी काम करत असल्यामुळे त्यांच्या कामाची शिवराज्य युवा संघटनेने दखल घेऊन भाऊसाहेब पा चव्हाण  त्यांची नायगाव तालुका प्रमुख पदी तर शिवाजी पा शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव यांची निवड केली आहे .

शिवराज्य युवा संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात केले जात आहे त्यामुळे यांची समाजाप्रती तळमळ पाहून ज्या ठिकाणी गरीबावर अन्याय होईल त्या ठिकाणी भाऊसाहेब पा चव्हाण व शिवाजी पा शिंदे यांनी पल्या समाज कार्यातून त्यांना न्याय दिला शेतकर्‍यांसाठी आंदोलन विविध मागण्यांची शासन स्तरावर आपल्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देऊन पोहोचवण्याचे काम केले आहे.

नायगाव तालुक्यात राज्य संघटक कार्यकर्ता निर्माण करून देण्याचे कार्य प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील सर्जे सुमित पाटील कल्याण नितीन पाटील घुगे विजय वगंघवार हनुमंत पुसलवाड  केदार  जाधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *