नांदेड – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेची ऑनलाईन गुगल मीट आढावा बैठक व आॅनलाईन सभासद नोंदणी लिंकचे उदघाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डाॅ. गोविंद काळे (मराठवाडा अध्यक्ष ) तर प्रमुख उपस्थिती सन्माननीय राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष ज.मो .अभ्यंकर साहेब (राज्यमंत्री दर्जा ) आॅनलाइन गुगल मीट च्या बैठकीस उपस्थित होते . यावेळी नांदेड जिल्ह्यातील शिक्षक सेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी महिला संघटक, सल्लागार , मार्गदर्शक या ऑनलाइन गूगल मीट कार्यक्रमास उपस्थित होते .
आॅनलाईन बैठकीत नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित असणारे शिक्षकांचे प्रश्न व मा. शिक्षणाधिकारी साहेब यांनी काढलेल्या अर्धशासकीय पत्रावर पुढील निर्णय घेणे तसेच अर्धापूर , मुदखेड तालुक्यातील मुख्यालयी राहणे संदर्भात घरभाडे कपातीबाबत कपात न होणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे, जुनी पेन्शन योजना लागु करणे , नांंदेड जिल्ह्यातील सर्व रिक्त पदे भरणे , अशा मागण्याचे प्रस्ताव साहेबांकडे मागणी करण्यात आले. यावेळी माननीय राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर साहेब यांनी प्रत्येक प्रश्नावर चर्चा करून मार्गदर्शन केले व शासन स्तरावरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले , तसेच शिक्षक सेना नांदेड शिक्षक बांधवांच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात आवाज उठवित असते व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी पाठपुरावा करत असते. तसेच अन्याय झालेल्या बांधवांसाठी लढा देऊन न्याय देत आलेली आहे. म्हणून जिल्हा शाखा नांदेडचे एकदम चांगले काम आहे त्याबद्दल अभिनंदन केले.
सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरुच असल्यामुळे शिक्षक बांधवांशी संपर्क होऊ शकत नाही. भेटी होऊ शकत नाहीत यामुळे शिक्षक सेना नांदेड ने सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन सभासद नोंदणीचे लिंक व्हाटसपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. या लिंकला टच करतात आपली माहिती इंग्रजीत किंवा मराठीत भरावी व शिक्षक सेनेचे सभासद व्हावे, शिक्षकांच्या नेहमी प्रश्नासाठी काम करणाऱ्या संघटनेचे सभासद व्हावे व संघटन मजबूत करावे . संघटनेचे सभासद व्हा एकजूट दाखवा. सर्व शिक्षक बांधवांनी व महिला भगिनी शिक्षक सेनेचे सभासद व्हावे असे आवाहन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर , सरचिटणीस रवी बंडेवार कोषाध्यक्ष गंगाधर कदम , कार्याध्यक्ष मनोहर बंडेवार सर्व जिल्हा उपाध्यक्ष सर्व जिल्हा संघटक सर्व तालुका पदाधिकारी महिला संघटन, केंद्र समन्वयक सदस्य , यांच्यावतीने करण्यात आले आहे.