नांदेड – ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित काव्यपौर्णिमा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंधरा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वर्षातील एकूण सहा काव्यपौर्णिमा आॅनलाईन घेण्यात आल्यानंतर सातवी काव्यपौर्णिमा प्रत्यक्ष बुद्ध विहारात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करुन व खबरदारी घेऊन साजरी करण्यात आली. तसेच सॅनिटाईझर, मास्क, सोशल डिस्टन्स पाळून काव्यपौर्णिमा मालेतील तेहतिसावी काव्यपौर्णिमा साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष शामराव वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी, लेखक अनुरत्न वाघमारे, साहित्यिक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
आश्विन पौर्णिमेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन संपन्न झाल्यापित्यर्थ शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील बुद्धसं बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती कार्यक्रम घेण्यात आला. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे धूप, दीप, आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्रिसरण, पंचशील, बुद्ध धम्म संघ वंदना घेण्यात आली. यावेळी बुद्धं सरणं गच्छामीचा स्वर निनादला. सिडको येथील पुजनीय भंते दीपरत्न यांच्याकडून धम्मदेसना देण्यात आली. त्यानंतर सुमेध कलामंचाच्या वतीने बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. आश्विन पौर्णिमेनिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने तेहतिसावा काव्यपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. यात कवी अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, बाबुराव कपाळे, शेषराव वाघमारे यांनी सहभाग नोंदवला.
सप्तरंगी साहित्य मंडळाकडून ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामराव वाघमारे, गंगाधर वडने, भगवान वाघमारे, कृष्णा गजभारे, अशोक कांबळे, के.एस. चौदंते, मल्हारी पंडित, गंगाधर मल्हारे, व्यंकटराव आठवले, दिगांबर जमदाडे, शेषराव वाघमारे, बाबुराव कपाळे, सत्यपाल परघणे, पांडूरंग जमदाडे, हंसराज वन्ने यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे लिखित धुतलेलं मातेरं हा कवितासंग्रह भेट देण्यात आला.कार्यक्रमाचे संवादसूत्र गंगाधर वडने यांनी हाती घेतले तर आभार प्रदर्शन कृष्णा गजभारे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रसारण करण्यासाठी पांडूरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे यांनी प्रयत्न केले. तर बुद्ध विहारात झालेल्या कार्यक्रमासाठी नितीन एंगडे, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी सरोदे, उपाध्यक्ष कमलाबाई हटकर, प्रतिभा हटकर, अपर्णा हटकर, अपूर्वा हटकर यांनी परिश्रम घेतले.