खासदार प्रताप पाटील चिखलीकर कोणाच्याही कामाचे श्रेय घेण्यात पटाईत — मा.आ.शंकर अण्णा धोंडगे


देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना अरोग्य केंद्रास  मजुरी का मिळाली नाही—शंकर अण्णा धोंडगे यांचा चिखलीकर यांना सवाल


कंधार ;मो.सिकंदर


लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत असताना तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून या मतदारसंघात नव्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर सहा उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असल्याचा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. यावर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी खा.चिखलीकर हे नको त्या कामाचे श्रेय घेण्यात पटाईत आहेत.देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना का मान्यता मिळाली नाही आसा टोला मा.आ.शंकर अण्णा धोंडगे यांनी  लगावला आहे.


ज्या गावची लोकसंख्या दहा हजार पार होत असते त्या ठिकाणी अरोग्य केंद्राचा बृहत आराखडा जिल्हा परिषद करत आसते.त्याच अनुषंगाने  राज्यसरकारच्या बृहत आराखड्यात २०१७ मध्येच या आरोग्य केंद्रांना  जिल्हा परिषदने प्रस्तावित करण्यात आले होते.यात काही नविन नाही.खासदार प्रताप पा.चिखलीकर हे नको त्या व कोणाच्या ही कामाचे श्रेय घेण्यात पटाईत आहेत.हा अरोग्य केंद्राचा आराखडा २०१७ ला गेला होता परंतु यावर देवद्र फडवणीस यांनी मजुरी दिली नाही .फडवणीस मुख्यमंत्री असताना जर का या अरोग्य केंद्राला मजुरी मिळाली असती तर या कामाचे श्रेय घेण्यात काही अडच नव्हती. सध्या जगात कोरोना व्हायरस या महामारीचे थैमान आहे.

महाविकास आघाडीचे सरकाने नागरीकांच्या आरोग्याकडे जातीचे लक्ष दिले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात असा एकही नविन रुग्णालय किंव्हा अरोग्य केंद्रास मजुरी नाही. कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयास मजुरी मिळाली असल्याचा दावा विद्यमान आमदार करत आहेत परंतु  कंधार व लोहा  येथिल उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आघाडी सरकारच्या काळातच मजुर झाला होता. लोहा येथिल इमारतीचे काम झाले परंतु कंधारच्या बाबतीत किरकोळ त्रुटी असल्यामुळे हे काम होऊ शकले नाही.प्रताप पाटील हे आमदार असताना त्यांना कंधारच्या रुग्णालयाच्या बाबतीत असलेल्या किरकोळ त्रुटी दुरुस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे कंधारच्या उप जिल्हा रुग्णालयाचे काम जैसे थे राहीले.कंधार उपजिल्हा रुग्णालयाला आघाडी सरकारनेच मजुरी दिली आहे त्यात काही नविन नाही.या आमदार व खासदारानी त्यांच्या कार्यकाळात नविन काय दिवे लावले,कोणता एखादा नविन प्रकल्प किंव्हा काम आणले ते दाखवावे आसा  सवाल माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केला आहे.


      मतदारसंघातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत किवळा रिसनगाव माळेगाव तर कंधार तालुक्यातील कवठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे अशा प्रस्ताव सन २०१७ च्या बृहत आराखड्यातनवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद ने तयार केली होती लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत किवळा रिसनगाव माळेगाव तर कंधार तालुक्यातील कवठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर लोहा तालुक्यातील दापशेड कांजाळा बेट सांगवी कलंबर खुर्द आणि कंधार तालुक्यातील कोळगाव सावरगाव निपाणी या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात येणार आहेत सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारीत २०१७ च्या बृहत आराखड्यात नव्या पाच आरोग्य केंद्र उपकेंद्र या प्रस्तावित करण्यात आला होता हे काही नविन नाही २०१७ ला हा प्रस्ताव गेला होता तर हा मजुर होण्यास चार वर्ष का लागली देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना का मजुरी देण्यात आली नाही.खा.चिखलीकर यांना कोणत्याही व कोणाच्याही कामाचे श्रेय घेण्यात पटाईत असल्याचा अरोप माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *