कंधार : सय्यद हबीब
कंधारचे तहसीलदार सखाराम मांडावगडे यांची जिंतूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे विजय चव्हाण यांनी प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.६ अॉक्टोबर रोजी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी त्यांनी कंधार शहरातील सामान्यातल्या सामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचा मनोदय विजय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे ते कंधार तालुक्यातील भुमीपुत्र आहेत. ग्रामीण भागातून तालुक्याच्या सर्वोच्च अधिकारीपदी चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने त्यांना काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कडून जनसामान्यांनाची मोठी अपेक्षा वाढली आहे.