अशासकीय समित्या गठित करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण व आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्याकडे पाठपुरावा करणार _काँग्रेसचे पं स .गटनेते श्रीनिवास मोरे
लोहा /प्रतिनिधी
_लोहा तालुक्यातील अशासकीय समित्या रखडल्यामुळे नागरिकांच्या अनेक कामांना ब्रेक लागला असून या अशासकीय समितीचा गठित करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण व नांदेड दक्षिण मतदार संघाचे आ . मोहन अण्णा हंबर्डे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे लोहा पं.स. चे गटनेते श्रीनिवास मोरे यांनी दिली. राज्यात गेल्या वर्षी सतातंर झाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे.
पूर्वीच्या सरकारने नेमलेल्या राज्यातील व जिल्ह्यातील सर्व अशासकीय समित्या बरखास्त झालेल्या असून यामुळे नागरिकांचे अनेक कामे रखडली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देऊन नवीन समित्या गठन कराव्या अशी मागणी जनतेतून होत आहे. यात तालुका स्तरावर अनेक महत्त्वाच्या समित्या असून यांच्या अध्यक्ष व सदस्यांची निवडी अद्याप पर्यंत झालेल्या नाहीत यात संजय गांधी निराधार योजना समिती ,तालुका समन्वय समिती, रोहयो समिती, दक्षता समिती आदी विविध समित्यांच्या निवडी रखडल्या आहेत. यात अत्यंत महत्त्वाची व गोरगरीब वयोवृद्ध नागरिक विधवा महिला,
अपंगांसाठी कार्य करणारी समिती असणारी संजय गांधी निराधार समिती आहे या समितीची निवड न झाल्यामुळे अनेक लाभार्थ्याचे कामे रडखडले आहेत. तसेच तालुका समन्वय समिती ही तालुका स्तरावरील अत्यंत महत्त्वाची समिती आहे. ही समिती तालुक्यातील सर्व विभागाचा आढावा घेऊन विविध विकास कामे होण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय राखते, तसेच रोजगार हमी योजना ही एक महत्त्वाची समिती आहे ग्रामीण भागातील मजूरां च्या हाताला कामे देण्यासाठी व दुष्काळ निवारण्यासाठी ही समिती कार्य करते असे अनेक विविध शासकीय समित्या रखडल्यामुळे नागरिकांची कामे रखडली आहेत.
तेव्हा याकडे महाविकास आघाडी सरकारने व पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे. राज्यात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असे महा विकास आघाडीचे सरकार असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नामदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहे.
तेव्हा लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की आमचे नेते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण व नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्याशी मी एक वेळ लोहा तालुक्यातील अशासकीय समित्या गठीत करण्याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व त्यांच्याकडे लोहा तालुक्यातील अशासकीय समित्या गठीत करण्याची मागणी केली आहे
याबाबत ते सकारात्मक असून मी पुन्हा एक वेळेस याबाबत नामदार अशोकरावजी चव्हाण व आ.मोहन अण्णा हंबर्डे यांना भेटून लवकरच अशासकीय समितीचे नेमणुका करा म्हणून पाठपुरावा करणार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे लोहा पंचायत समितीचे गटनेते श्रीनिवास मोरे यांनी दिली आहे.