केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे निधन

पासवान यांनी ७३ व्या वर्षी घेतला आखेरचा श्वास!

नवीदिल्ली दि 9 | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी ७३ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. “पप्पा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.

रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष हेत् त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते.

बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

#Ram_Vilas_Paswan #bjp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *