लोहा पंचायत समितीच्या वतीने गट विकास अधिकारी प्रभाकर फांजेवर यांना निरोप

लोहा /प्रतिनिधी
लोहा पंचायत समितीमध्ये 2017 पासून ते आजपर्यंत गेली साडेतीन वर्षे उत्कृष्ट सेवा देणारे लोहा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय गट विकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांची शासन नियमानुसार नायगाव पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
त्याबदल त्यांचा लोहा पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीच्या पारंपरिक रितीरिवाजानुसार भव्य दिवे कपडेरुपी भेट शाल श्रीफळ रेशमी टोपी पुष्पहार प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती अनंत पाटील शिंदे होते तर प्रमुख उपस्थिती लोहा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी सभापती सतीश पाटील उमरेकर ,पं.स. सदस्य कैलास जाकापुरे, नायब तहसीलदार राम बोरगावकर ,नूतन गट विकास अधिकारी प्रकाश जोंधळे , गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के , आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना गट विकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड म्हणाले की, लोहा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सरपंच , ग्रामसेवक,पत्रकार बंधू आदीने भरभरून प्रेम दिले सहकार्य केले सर्व सहकाऱ्यांमुळे लोहा पंचायत समिती मध्ये साडे तीन वर्षे सेवा केली कामामध्ये कधीही दिरंगाई केली नाही. माझ्याकडे जे काम आले ते पाच मिनिटांत मध्ये सहया करून त्यांचे काम पूर्ण केले. मी असे काही करीत नाही पण माझा सत्कार जिथे जातो तिथे होतो मी येथे येण्याच्या अगोदर जिथे बीडीओ होतो तिथे ही असाच सत्कार झाला होता. मला जे लोहा वासियांनी भरपूर प्रेम दिले ते मी कधीही विसरू शकत नाही असे गट विकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड म्हणाले.
तसेच यावेळी पं.स.सभापती आनंद पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड ,नुतन गटविकास अधिकारी प्रकास जोंधळे यांचेही भाषणे झाली .
यावेळी लोहा पंचायत समितीचे कक्ष अधिकारी चोरमुले, कार्यालयीन अधीक्षक गुट्टे, वाघमारे, बी.जी.मुंडे , ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शिंदे,सचीव बिसमिले , कार्याध्यक्ष ढगे, राठोड, यांच्या सहीत लोहा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक , तलाठी, पत्रकार बंधू आदी उपस्थित होते . सर्वांनी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम सोशल डिस्टिंक्शन पाळून संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *