कंधार ;
दरवर्षी जुलै महिन्यामध्ये प्रशासनातर्फे व काही सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण केले जाते कोणी 50 झाडे लावतो कोणी दहा झाडे लावतो कोणी एक झाड लावतो परंतु त्या झाडांची निघा राखली जात नाही सर्वांनी लावलेल्या झाडांना एक वर्ष जोपासलं तर ती झाडं आपल्याला आयुष्यभर जोपासतात या फेसबुकच्या माध्यमातून मी सर्व मित्र परिवार यांना विनंती करतो की आपण पण जी झाडे लावलेली आहेत त्यांना जोपासण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस सुनिल पत्रे यांनी केले आहे.