मुदखेड ; पि.एल.गाडेकर
सध्या भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाचे मोठ्या प्रमाणात सावट असल्यामुळे अनेक बैठका मिटिंग इत्तर ऑनलाईन कारभार होत आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे ऑनलाइन बैठक ऑनलाइन झूम ॲपद्वारे “स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याची” नुकतीच सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील बारड या गावचे सुपुत्र राष्ट्रीय खेळाडू बालाजी एल गाडेकर यांची “लातूर विभाग प्रमुख सचिव पदी ” सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बालाजी एल गाडेकर यांची क्रीडा क्षेत्रात विविध भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ट्रेडिशनल रेसलिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सी.ए.तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.४ ऑक्टोबर २०२० रोजी स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्यची दि.४ ऑक्टोंबर रोजी झुम अॅपद्वारे ऑनलाईन सर्वसाधारण सभा(बैठक) संपन्न झाली.यावेळी सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष व सचिव आणि इतर पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीस्तव ऑनलाईन सहभाग घेतला. जवळपास ३ तास चाललेल्या या बैठकीत महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून कोरोना प्रादुर्भाव काळा नंतर खेळाडूंच्या पुढील भवितव्या बाबद चर्चा करण्यात आली.तर बेल्ट रेसलिंग व पेनक्रेशन या खेळा विषयी माहिती देण्यात आली.तसेच महाराष्ट्रातील ८ विभागात या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता विभाग प्रमुखांची निवड (नियुक्ती) करण्यात आली. यामध्ये प्रथमच नांदेड जिल्ह्याला लातुर विभागात मोठे स्थान प्राप्त झाले आहे बारड येथील एक जिद्दी कष्टाळू मेहनती पालक वर्गामध्ये विश्वासात पात्र ठरलेला एक राष्ट्रीय खेळाडू अनेक खेळांमध्ये पारांगत असलेला अनेकांच्या मनामध्ये क्रीडाविषयक स्फुल्लिंग अनेकांच्या मनामध्ये खेळाविषयी मोठा विश्वास निर्माण करून त्यांना आंतरराष्ट्रीय पदापर्यंत घेऊन जाणारा इतरांच्या मनामध्ये खेळाविषयी प्रेम जागवणारा त्याच्या नेतृत्वाखाली अनेक आत्मसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना निर्भीड करणारे तसेच शेकडो मुलींना कराटे याद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे आणि देशासाठी पात्र खेळाडू तयार करणारे अशी त्याची ओळख निर्माण झाली होती याप्रसंगी सर्वानुमचे लातूर विभाग प्रमुख सचिव पदी बालाजी एल.गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मधून विविध संघटना सामाजिक क्षेत्रातून व क्रीडा क्षेत्रातून त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केल्या जात आहे त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.