लोहा; प्रतिनिधी
लोहा येथे दि.११ ऑक्टोंबर 2020 रोजी मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन अॅड विनोद भैय्या पाटील हे करणार आहेत.
मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे.मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर महाराष्ट्र मध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे त्यामुळे लोहा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण स्थगिती वर चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात भव्य एल्गार मेळावाचेआयोजन करण्यात आलेली आहे
तरी दि. 11 ऑक्टोबर रोजी दु 12 वाजता लोहा येथील व्यंकटेश गार्डन मध्ये या बैठकीला मराठा आरक्षण याचिकाकर्ते अॅड. विनोद भैया पाटील हे उपस्थित राहणार असुन ते प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा या भव्य एल्गार मेळाव्यास सकल मराठा समाजातील सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय व युवकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सकल मराठा समाज लोहा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे