नायगाव ;
नायगांव तालुक्यातील पंचायत समितीमध्ये अनेक वर्षापासून एकाच टेबलावर कार्यरत असलेले हनुमंत घुळेकर एक्स यांच्याकडे एम आर ईजी एस स्वच्छता भारत व कृषी असे विविध कमी करण्याचे त्या टेबलावर आहे पण एकीकडे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आसतांना देखील नायगांव पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक हणमंत घुळेकर यांच्या मालदार टेबलवर मात्र लाभार्थ्यांची दररोज तोबा गर्दी होताना दिसत आहे .
सदरील कनिष्ठ सहाय्यक हणमंत घुळेकर यांच्याकडे वरीष्ठांची मेहरनजर आसल्यामुळे रोजगार हमी योजना , स्वछ भारत मिशन (एस.बी.एम. शौचालय योजना ) , कृषि संबंधित विवीध योजना ह्या अतिशय महत्वाच्या योजनेची कामे एकाच टेबलवर देण्यात आल्यामुळे कर्मचारी मालामाल आणि लाभार्थी खेटे घालून कंगाल होत आसल्याचे बोलल्या जात आहे . या टेबलावर अनेक लाभार्थी आर्थिक व्यवहार करून ते कमी करण्याचा सपाटा कनिष्ठ सहाय्यक हणमंत घुळेकर करत आहे त्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ पदभार काढून त्यांच्या टेबलावर झालेल्या सर्व कामाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अन्यथा शिवराज्य संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे
नायगाव तालुका परीसरातील लाभार्थी हे आपल्या कामासाठी अनेकवेळा पंचायत समितीच्या सदरील टेबलवर खेटे घालत आसतात त्याचाच फायदा घेत सदरील कनिष्ठ सहाय्यक महाशय हणमंत घुळेकर हे लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करुनही फाईल वेळेवर पुढे पाठवीत नसल्यामुळे लाभार्थी परेशान आसल्याचे बोलून दाखवत आहेत .
तरी या अगोदरचे प्रभारी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी पुर्ववत दुसऱ्या कनिष्ठ सहाय्यकाला त्यांचा टेबल बहाल करुन एकाच टेबलवर होणाऱ्या गर्दीवर आवर घालावा तसेच लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी जोर धरली आहे . पण तसे काही झाले नाही व प्रभारी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या काळात नायगाव पंचायत समिती अनेक बोगस कामे झाले आहेत त्या सर्व पुलावर झालेल्या कामाची खात्यानेही आठ दिवसात चौकशी करण्यात यावी अन्यथा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रम पाटील बामणीकर शिवराज्य संघटना जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिली आहे दिलेल्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री फाजेवाड यांना दिले आहे.