लोहयात शिवसेनेच्या वतीने अॅड स्वप्नील पाटील गारोळे यांचे अभिष्टचिंतन

लोहा /प्रतिनिधी

लोहयात शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे लोहा तालुका संघटक अॅड स्वप्नील पाटील गारोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा लोहा तालुका शिवसेनेच्या वतीने लोहा येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात अभिष्टचिंतन करण्यात आले.

 शिवसेनेचे लोहा तालुका संघटक अॅड स्वप्नील पाटील गारोळे हे शिवसेनेचे एकनिष्ठ प्रामाणिक सक्रीय उच्च शिक्षीत असुन  शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.सामाजिक, शैक्षणिक राजकीय व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असणारे अॅड स्वप्नील पाटील गारोळे यांनी शिवसेना पक्षवाढी सदैव सक्रिय सहभाग नोंदवितात गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या कामांना ते नेहमी प्राधान्य देतात.

शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , युवा सेना प्रमुख तथा राज्याचे  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रेरणा घेऊन त्यांचे उल्लेखनीय कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याची दखल  व वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा लोहा तालुका शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून अभिष्टचिंतन केले.


यावेळी शिवसेना लोहा तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले, शिवसेना प्रेणित किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अमर शेख, सरपंच भीमराव पाटील शिंदे, तिरूपती पाटील घोरबांड ,आदी उपस्थित होते.


तसेच शिवसेना लोहा तालुका संघटक अॅड स्वप्नील पाटील गारोळे यांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे खा.हेंमत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , शिवसेनेचे लोहा -कंधारचे नेते बाळासाहेब पाटील कराळे, शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार,आदीने शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *