कंधार ; दिगांबर वाघमारे
महाकरिअर पोर्टल बाबत गटसाधन केंद्र-कंधार येथे विद्यार्थी पालक संवाद दि. 5 ते 9 आक्टोबर या कालावधीत गटशिक्षणअधिकारी रविद्र सोनटक्के यांच्या पुढाकारानेदररोज सकाळी 8.30 वाजता व रात्री 7.00 वाजता अशा दररोज दोन ऑनलाईन संवाद कार्यशाळा याप्रमाणे एकूण 10 कार्यशाळा संपन्न झाल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था- नांदेड व शिक्षण विभाग , जिल्हा परिषद – नांदेड यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड चे मा.प्राचार्य श्री.रविद्र अंबेकर, मा. शिक्षणाधिकारी ( प्रा.) प्रशांत दिग्रसकर , मा. शिक्षणाधिकारी (मा.) श्री कुंडगीर व मार्गदर्शक, अधिव्याख्याता तथा कंधार तालुका संपर्क अधिकारी श्रीमती ज्योत्सना धुतमल , गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र सोनटक्के यांच्या नेतृत्वात कंधार तालुका अंतर्गत इयता 9 वी ते 12 वी वर्गात शिक्षण घेणारे विदयार्थी, पालक यांना महाकरिअर पोर्टलची माहिती व्हावी व त्यांच्या मनातील प्रश्नांची व शंकांचे निराकरण व्हावे या सुहेतुने सदर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या कार्यशाळेत दिपक माळी सहसंचालक, व्हिजीपीजी विभाग (एससीईआरटी)- पुणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर उस्मानाबादचे विवेकानंद कदम ,पालघर येथिल रॉबर्ट अलमेडा यांनी या विषयावर समुपदेशन केले.सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख ,सर्व विषयतज्ञ ,सर्व विशेष शिक्षक यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
ही कार्यशाळा यशस्वीतेसाठी बारूळ केंद्र प्रमुख गणेश थोटे, मलगीरवार एस.एस. विशेष शिक्षण तज्ञगटसाधन केंद्र – कंधार,आनंद तपासे आदीनी परीश्रम घेतले.तर सुत्रसंचलन विषय तज्ञ कनोजवार एस.आर.यांनी केले.