महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १२ रोजी राज्यव्यापी आंदोलन -सौ. उमाताई खापरे

मुंबई ;

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच
आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरुच आहे. भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळयून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला.

पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधाविधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही.

यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशीन व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर
घटनांना गांभीर्याने घेत नाही.

वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे दिनांक २२सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिका-यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी
सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते.

परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे दिनांक१२/१०/२०२० रोजी महिला मोर्चा , महाराष्ट्र प्रदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे अशी माहीती भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *