लोहा/ प्रतिनिधी
एकच लक्ष्य एकच पक्ष फक्त मराठा आरक्षण असे प्रतिपादन सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते अॅड. विनोद भैया पाटील यांनी लोहा येथे मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करताना केले. लोहा येथे आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2020 रोजी व्यंकटेश गार्डनमध्ये सकल मराठा समाज लोहा तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात भव्य एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस अॅड विनोद भैया पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्र. हंसराज पाटील बोरगावकर ,उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार , सुधाकर पाटील पवार , छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे , धर्मवीर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चव्हाण, मधुकर महाराज बारुळकर , विजय चव्हाण, श्याम पाटील पवार, पवन वडजे, राम पाटील पवार, नागेश पाटील खांबेगावकर , आनंद पाटील गारोळे, सुजित चव्हाण, श्रीकांत पवार, पवन लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अॅड विनोद भैय्या पाटील म्हणाले की मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून अनेक प्रवास केले या नेमकं सर्व प्रवासामध्ये माझ्यावर न्यायालयात लढण्याची जबाबदारी घेतलो व मी लढलो यात दोन वेळेस विजय झाला एक वेळेस पराभव झाला न्यायालयाने हा कायदा रद्द केला नाही मला जाणीव आहे मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढलेत गट-तट विसरून सर्वजण एकत्र आलोत न्यायालयीन लढाई लढलोत . मराठा आरक्षणाची सुरुवात औरंगाबाद येथून झाली त्यावेळी कोपर्डी ची घटना घडली छत्रपती ची शपथ घेऊन सांगतो मला डोळ्यासमोर माझी मुलगी दिसली.मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर तरुण विद्यार्थ्यांचे डोळे बोलत होते आम्हाला शिक्षण घेऊन गावाकडे जावे लागत आहे शिक्षण घेऊन नोकरी लागत नाही. ज्येष्ठ वकील हरीश साळवे सुप्रीम कोर्टात उभे राहिले .
चीप डिस्टिक यांनी सांगितले आरक्षणाला स्थगिती आली आहे.मराठा आरक्षण सहजासहजी मिळाले नव्हते राज्य सरकारने मागास आयोगाचा रिपोर्ट घ्या सर्वे घ्या असे सांगितले तर सर्वे घरी बसून झाला नाही. आयोग सांगतो मराठा समाजात किती डॉक्टर आहेत किती कलेक्टर आहेत किती अधिकारी आहेत किती जमीन आहे हे सर्व रिपोर्ट घेऊन हाय कोर्टात गेल्यानंतर राज्य सरकारने आरक्षण दिले. जे आरक्षणाविरोधात गेले त्यांना सांगा हा विषय संपला सुप्रीम कोर्टात जाऊ नका. पण विरोधक सुप्रीम कोर्टात गेले राज्य सरकारला मला सुप्रीम कोर्टाची नोटीस आली.
लाॅकडॉऊन मध्ये दिल्ली शांत होती तर याचिका चालू झाली. लाॅकडॉऊन मध्ये कोणतीही नोकरी नाही कोणतीही जागा निघाली नाही पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर स्टे दिला. राज्य सरकारला जाब विचारा 2014 ते 2020 पर्यंत च्या विद्यार्थ्यांना नोकरी मध्ये समाविष्ट करा मराठा विद्यार्थ्यास सवलती द्या. मी मराठा आरक्षण मिळावे म्हणून याचिका दाखल केली त्यावेळेस भाजपवाले म्हणत होते विनोद पाटील राष्ट्रवादीचा आहे आता राष्ट्रवादीवाले म्हणत आहेत विनोद पाटील भाजपाचा आहे मी सर्वांना सांगतो की माझा कोणताही पक्ष नाही मराठा आरक्षण हाच पक्ष मराठा आरक्षण हेच लक्ष्य आहे .
मी मराठा आरक्षण मिळावे म्हणून सर्वांना भेटलो आहे असे अॅड विनोद भैया पाटील म्हणाले. यावेळी या मराठा आरक्षण स्थगिती एल्गार मेळाव्यास लोहा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले तर आभार सुधाकर पाटील व माऊली पवार यांनी मानले. कार्यक्रम सोशल डिटेक्शन पळून मास्क वाटप करून व सॅनीटाझर करून संपन्न झाला.
याचिकाकर्ते अॅड विनोद भैय्या पाटील यांना न्यायालयीन लढाई लढावी त्यांना बळ मिळावे म्हणून त्यांचा लोहयाच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. लोहा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांनी सुरू केलेली खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्याची ही परंपरा आजही चालू आहे.