कंधार ; दिगांबर वाघमारे
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दुर्गा माता उत्सव, ईद ए मिलाद, धम्म परिवर्तन दिन आदी कार्यक्रम सार्वजनिकरीत्या साजरा न करता वैयक्तिक पातळीवर साजरा करावा आणि संसर्ग टाळावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी शांतता बैठकीत कंधार येथे केले .
कंधार येथील पोलीस स्टेशन येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासमवेत दुर्गा माता उत्सव, ईद ए मिलाद ,धम्मचक्र परिवर्तन दिन या निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनिषा पवार यांच्या उपस्थितीत सदरील बैठकीचे आयोजन करण्यात होते.
यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले की संपूर्ण जगात कोरोना संसर्गवाढत आहे. ग्रामीण भागामध्ये लाकडाउन कमी केल्यापासून संसर्गाचा वेग वाढत आहे.तो सध्या कमी करण्यासाठी शासनाचे व प्रशासनाचे आदेश प्रत्येकाने पाळणे गरजेचेआहे. येत्या काळात दुर्गा माता उत्सव, ईदए मिलाद, धम्म परिवर्तन दिन आदी उत्सव सुरू होत आहेत. सर्व जनतेने लॉकडाउनच्या काळातचांगले सहकार्य केले आहे. भविष्यातही तसेच सहकार्यकरणे गरजेचे आहे.
मूर्ती आणताना सार्वजनिकरीत्या जाऊ नये, रस्त्यावर, चौकात व सार्वजनिक ठिकाणी यंदा दुर्गा माता मूर्ती स्थापन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मंदिर आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आरती करावी पदाधिका-यांनी एकाच वेळी गर्दी करु नये,दुर्गा विसर्जन गणेश विसर्जना सारखे करावे.सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये ,वाद्ये ,डाल्बी लावू नये आदी सुचना यावेळी शांतता कमिटी बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मन्नान चौधरी, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी बाळासाहेब पवार, मगदूम कुरेशी, शेख खयूम, सरपंच बबरमोहम्मद, माधव कांबळे, आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.