नांदेड –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरामुळे मुका माणूस लिहायला, बोलायला लागला. त्यांचे विचारधनच समाजाला तारू शकतात. शिक्षण आणि वाचन, चिंतनाशिवाय पर्याय नाही. प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करावयाचा असेल तर आपली बौद्धिक मशागत उत्तम असली पाहिजे असे त्यांना वाटते. आंबेडकरी साहित्यातील शब्द म्हणजे क्रांतीचा आवाज असल्याचे प्रतिपादन येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी केले. ते ज्येष्ठ कवी दु. मो. लोणे यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ते आॅनलाईन शुभेच्छा देतांना केले.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने प्रा. लोणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, रमाबाई लोणे, बेबीताई लोणे, जयश्री लोणे, सुरेश महाबळे, संजिवनी महाबळे उपस्थित होते. यावेळी दु.मो. लोणे म्हणाले की, येणारा दिवस महत्त्वाचा आहे. विचारांतील अखंडता, तत्त्वनिष्ठा, लीनता आणि सौजन्य हे आजच्या लेखकांनी त्यांच्या साहित्यातून मांडले पाहिजे. माणसांनी माणसांसाठी ही चळवळ सतत सुरु ठेवली पाहिजे. मला माणसांच्या सौंदर्याचे शब्द जगण्याची उर्जा देतात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डॉ. जगदीश कदम यांनी दिलेला संदेश अनुरत्न वाघमारे यांनी वाचून दाखवला. साहित्य मंडळाकडून नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे ,प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य/वागरे यांच्यासह तुकाराम गायकवाड, सोमीनाथ चौरंगे, जळबा कांबळे, जगन गोणारकर, मारोती कदम, नानासाहेब पटाईत, अनंता राऊत, माधव अटकोरे, प्रदीप ठाकूर, विवेक मवाडे, विकास कदम, साहेबराव सोनकांबळे, सुरेश हटकर, निलेश गायकवाड, अशोक कांबळे, डी.डी. राऊत, सदाशिव गच्चे, पंडित कांबळे यांनी प्रा. लोणे यांचे अभिष्टचिंतन केले.