कंधार ; दिगांबर वाघमारे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होतचालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच
आहे.त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरुच आहे. दि.१२ अॉक्टोबर रोजी भाजपा महिला मोर्च्या कंधार च्या वतीने तहसिलवर मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्रात महिलांन वरील वाढत्या अत्याचारा बाबत यावेळी घोषणाबाजी देत निषेध नोंदवून कंधार तहसिलदार विजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे ,कंधार भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,शहराध्यक्ष अॕड .गंगाप्रसाद यन्नावार ,सागर डोंगरजकर ,सौ.ॲड.औरादकर ,माजी नगरसेविका मुखेडकर , बडवणे ताई,मामडे ताई,गित्ते ताई वंदना डुमणे आदीसह महिलांची यावेळी उपस्थिती होती.
———————————————
*** व्हीडीओ बातमी .. भाजपा महिला मोर्च्या कंधार***