लोहयात काँग्रेसच्या नेत्या अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योध्याचा आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार-

माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार व युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर यांचा पुढाकार

लोहा / प्रतिनिधी
लोहयात काँग्रेसच्या नेत्या तथा माजी आ.अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्धयाचा काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार व युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम लोहयाच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहा पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अनिल मोरे, आदी उपस्थित होते.
यावेळी लोहा कोविड सेंटरमध्ये गेले सहा ते सात महिन्यापासून उत्कृष्ट सेवा करणारे डॉक्टर्स नर्स ड्रायव्हर काही सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.


यात लोहा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जाधव, डॉ. सुर्यवंशी, डॉ. पूर्वा सरकार , डॉ.देशमाने, डॉ ‌.देशमाने , डॉ. मिर्झा मॅडम, डॉ.सारिखा शेख, डॉ.देशमुख मॅडम , डॉ.देशपांडे मॅडम, डॉ. लोहारे , डॉ.शंकरे मॅडम, डॉ.चिगळे मॅडम, डॉ.भालेराव , डॉ. गाडेकर, डॉ.जामकर मॅडम , डॉ.राठोड मॅडम, नर्स लोखंडे मॅडम, मयुरी ससाने, अश्विनी जिरेवार , रणवीर , अल्का आठवले, स्वाती गायकवाड,108 गाडीचे सिध्दार्थ ससाने ,आतीश चालक,सतीश कबीर , बालाजी घोडके,सचीन गुंडाळे, काँग्रेसचे कार्यकर्ते गजानन कळसकर, डॉ.गवळी , सामाजिक कार्यकर्ते अमोल चव्हाण,आदीचा सत्कार शाल पुष्पहार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, युवक काँग्रेसचे बाबासाहेब बाबर, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार (बापू), लोहा न.पा.चे काँग्रेसचे गटनेते पंचशील कांबळे, माजी बांधकाम सभापती पंकज परिहार , माजी नगरसेवक अनिल दाढेल ,शरफोदीन शेख, पांडूरंग दाढेल, भूषण दमकोंडवार, गजानन कळसकर शिवाजी मुंडे, कैलास मोरे,सचीन बगाडे, आदी उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, आदीने केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा कोरोना योध्दा म्हणून सन्मान देत आहोत खरे म्हणले तर हे कोरोना योध्दा नाही तर कोरोनाला हरविणारे सैनिक आहेत ज्या कोरोनाने भाऊ, बहीण ,आई,वडील, मुलगा, यांना दूर केले त्यांना हरविणारे म्हणजे सैनिक आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या सिमेवरच्या सैनिका प्रमाणे यांनी ही कार्य केले. कोरोना झाल्यावर कुणीही जवळ येत नाही.आपण ही जवळ जात नाही. कोरोना काळात पुरूषा पेक्षा जास्त महिला डॉक्टर आहेत ज्या आपल्या मुला बाळांना सोडून कोरोना रूग्णांची सेवा केली त्यांबद्दल मी सर्वांचे आभार मानतो कोरोनाचा नायनाट करण्यासाठी कार्य केल्या .


आपण काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या काँग्रेसच्या नेत्या अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवला अमिता भाभी चव्हाण यांना दीर्घ आयुष्य लाभो असे आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले . प्रस्ताविक भाषण सोनू संगेवार म्हणाले की आम्ही आमच्या काँग्रेसच्या नेत्या अमिता भाभी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना काळात लोह्याच्या कोविड सेंटरमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचे प्राण वाचवलेल्या सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचारी यांचा फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सन्मान करतोत त्यांच्या पाठीशी आम्ही व काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभे राहतोत असे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार म्हणाले.
यावेळी आभार प्रदर्शन डॉक्टर लोहारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *