बाबा चा ढाबा

सोशल मीडियाच्या जगात कोण कधी फेमस होईल, हे सांगता येणार नाही. कधी कोणाचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होईल याचा पत्ता नाही. सध्या ‘बाबा का ढाबा’ची देशभरात चर्चा आहे. मटार पनीरसोबत पराठे विकणाऱ्या या बाबाच्या दुकानाबाहेर जत्रा भरत आहे. सोशल मीडियामुळे कोण रारोरात स्टार होईल, हे सांगणे जरी कठीण असले तरी फेमस झालेल्या या लोकांचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलतं. सध्या हे ढाबावाले बाबा चर्चेत आहेत. परंतु सोशल मीडियामुळे फेमस होणारे ते काही पहिले नाहीत. यापूर्वीही असे अनेक लोक सोशल मीडियामुळे फेमस झाले आहेत.

सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची प्रचंड चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे आहेत. फोटोत दिसणारे हे आजोबा एका फोटोत रडताना तर दुसऱ्या फोटोत हसताना दिसतात.

काही तासांमध्येच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. या घटनेमुळे आपल्याला सोशल मीडियाची ताकदसुद्धा लक्षात येईल. सोशल मीडियावरील अभियानामुळेच फोटोतील आजोबांना मदत मिळाली आहे.

दिल्लीच्या दक्षिण भागात मालवीय नगर परिसरात एक वयस्कर दांपत्याचं छोटंसं हॉटेल आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते हा ढाबा चालवत असल्याचं आजोबा सांगतात.

सदर आजोबांचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता. यामध्ये ते आपलं दुःख लोकांना सांगताना दिसतात. 80 वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी सकाळी सहा वाजता उठून जेवण बनवण्याची तयारी करतात. साडेनऊ वाजेपर्यंत जेवण तयार होतं.

सोशल मीडियाबद्दल कितीही वाईट बोलले तर त्याचे अनेक फायदेही आहेत. बुधवारी इण्टरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात वृद्ध जोडप्याची कहाणी ऐकून संपूर्ण देश हळहळला. दिल्लीत ढाबा चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जोडप्याला आता जगणं कठीण झालं आहे. ढाबा बंद असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे जेवायला जात नाही.

याचमुळे दोघांना दोन वेळचं जेवणही मिळत नव्हतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बाबा आणि त्यांच्या ढाब्याच्या मदतीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज पुढे आले आहेत. सोनम कपूरपासून ते रवीना टंडन आणि स्वरा भास्करपासून सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी नवं कॅम्पेन सुरू केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत ८० वर्षांचं जोडपे आहे. जे दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ चालवतात. व्हिडिओमध्ये वृद्ध आजोबा लॉकडाउनमुळे जेवण विकू न शकल्याचं दुःख बोलून दाखवतात. गिऱ्हाईक न आल्यामुळे त्यांना पैसेही मिळाले नाहीत आणि त्यांचं रोजचं जगणं कठीण होऊन बसलं.

हा व्हिडिओ ‘स्वाद ऑफिशियल’ या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला. याची एक क्लिप वसुंधरा शर्मा नावाच्या ट्विटर युजरने शेअर केली. अगदी थोड्याच काळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडिओला ४०.८ हजार आणि ९८.१ हजार लाईक्स मिळाले आहेत. १३ तासांत २ दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला.

व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येकाचंं मन पिळवटून जात आहे. सोनम कपूरने या व्हिडिओला रिप्लाय देताना म्हटलं की, कोणीतरी मला त्यांचा नंबर देऊ शकेल का… मला त्यांची मदत करायची आहे. यानंतर स्वरा भास्करने आपल्या चाहत्यांना दिल्लीत जाऊन ‘बाबा के ढाबा’ मध्ये जाऊन मटर चीज खाण्याचं आवाहन केलं. स्वराने लिहिले की, ‘चला दिल्लीकर ! मालवीय नगरात जाऊन ‘बाबा का ढाबा’ मटर चीज खाऊया!

वृद्ध जोडपं ३० वर्षांपासून चालवत आहेत ढाबा
हे जोडपे गेल्या ३० वर्षांपासून मालवीय नगरात स्वतःचा ढाबा चालवत आहेत. याचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर हजारो लोकांनी जोडप्याच्या मदतीसाठी हात पुढे केला. अवघ्या काही तासांमध्ये या दुकानाच्या बाहेर ग्राहकांची रांगच रांग लागली.

पण इतके कष्ट करूनसुद्धा त्यांची कमाई नाममात्रच असल्याचं आजोबा सांगतात. चार तास काम केल्यानंतर त्यांना कसेबसे 50 रुपये मिळतात. कोरोना संकटापूर्वीही त्यांचं उत्पन्न कमीच होतं. आता कोरोनामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे.

स्वाद ऑफिशियल या युट्यूब चॅनेलने सर्वप्रथम धाबावाल्या आजोबांचा व्हीडिओ बनवला. त्यानंतर वसुंधरा तन्खा शर्मा यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला. सोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “या व्हीडिओमुळे मला खूप दुःख झालं. दिल्लीकरांनो, शक्य असल्यास ‘बाबा का ढाबा’ला नक्की जा आणि जेवण करा.”

पाहता पाहता हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि टॉप ट्रेंडमध्ये आला. वयस्कर दांपत्याच्या मदतीसाठी अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला.

यानंतर गरीब श्रीमंत प्रत्येक जण बाबा का ढाबावर जेवणासाठी जाऊ लागला.

अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही हा व्हीडिओ ट्वीट केला. “‘ट्विटर भलंही करू शकतो,” असं त्या म्हणाल्या.

रवीना टंडन यांनीसुद्धा व्हीडिओ ट्वीट केला आणि लिहिलं, “बाबा का ढाबावर जेवण करणाऱ्यांनी मला त्यांचे फोटो पाठवून द्यावेत. मी प्रेमळ संदेशासोबत हा फोटो पोस्ट करीन.”

कृष्णा यांनी ट्वीट केलं, “फक्त सोशल मीडियावर ट्रेंड आहे म्हणून तिथं गर्दी करू नका, सगळं शांत झाल्यानंतरही तिथं जात राहा.”

आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती ट्वीट करून म्हणाले, “सांगितल्याप्रमाणे मी बाबांच्या ढाब्यावर गेलो. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी हे आवश्यक होतं. त्यांची मी काळजी घेईन. त्यांच्यासारख्या लोकांची मदत होण्यासाठी मी एक अभियान सुरू करत आहे.”

अभिनेत्री सोनम कपूर यांनीसुद्धा आजी-आजोबांची मदत करण्याचं आवाहन केलं.

अभिनेता सुनील शेट्टी यांनी त्यांचा व्हीडिओ शेअर केला. म्हणाले, “चला आपण त्यांचं हास्य परत आणू. आपण आपल्या शेजारी दुकानदारांची मदत केली पाहिजे.”

वयस्कर दांपत्याचे अश्रू पुसण्यासाठी हा व्हीडिओ फॉरवर्ड करत राहा, असं पोलीस अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी लिहिलं.

या घटनाक्रमानंतर आजी-आजोबांची परिस्थिती बदलून गेली. आजी म्हणाल्या, “काहीच कमाई होत नव्हती. कोणताच ग्राहक येत नव्हता. उरलेलं जेवण घरी नेऊन तेच आम्ही खात होतो. आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाहीत. मुलगीसुद्धा आमच्याकडेच राहते. ती काहीही काम करत नाही.”

पुढे आजी म्हणाल्या, “आज सकाळपासूनच लोकांची इथं गर्दी आहे. लोक चहा पिऊन गेले. जेवण करून गेले. गॅससुद्धा संपला होता. आता घरून सिलेंडर मागवला आहे. आज इतके लोक ढाब्यावर जेवले, मला खूप आनंद होत आहे.”

कोरोनाच्या संकटात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाबा का ढाबा हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे. लॉकडाऊनमध्ये बाबा का ढाबा चालवणाऱ्या आजोबांचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगलंच उचलून धरलं. त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच दिसला. एकेकाळी बाबाच्या ढाब्यावर कोणी फिरकतही नव्हतं. मात्र अचानक सोशल मीडियाच्या कमालीमुळे या आजोबांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी झाली. आजोबांच्या व्हिडीओनंतर आता कष्ट करणाऱ्या आजींचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने अनेकांना कसं जगायचं हा प्रश्न पडला आहे. दिल्लीतील बाबा का ढाबाच्या आजोबांप्रमाणेच एक आजी देखील ढाबा चालवतात. पार्वती अम्मा असं त्यांचं नाव आहे. घर चालवण्यासाठी पार्वती अम्मा केरळमध्ये एक छोटा ढाबा चालवतात. मात्र कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे खूपच कमी ग्राहक हे येत आहेत. ढाब्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे घर कसं चालवायचं?, कसं जगायचं? असा प्रश्न आजींना पडला आहे.

आजोबांप्रमाणेच आजींना देखील चांगला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे. अभिनेत्री रिचा चड्डाने देखील पार्वती अम्मांचा हा व्हिडीओ शेअर केला आसून लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीतील बाबा का ढाबा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता केरळमधील नागरिक अम्मांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आजोबांप्रमाणेच आजींना देखील चांगला प्रतिसाद मिळावा अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बाबा का ढाबा या व्हिडीओनंतर 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोक ढाब्यावर गर्दी करत आहेत. जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्धा दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे.

आजोबांच्या मदतीसाठी अनेकांचा पुढाकार होता. दिल्लीतील मालविया नगरमध्ये 80 वर्षीय आजोबांनी ‘बाबा का ढाबा’ सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं होतं. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आता अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला

सोशल मिडियाची ताकद फार मोठी आहे. या माध्यमातून रातोरात कुणी प्रसिद्धीच्या झोतात येतो तर कुणी अतोनात ट्रोल होतो. सोशल मीडियाने अनेक वेळा एकच मुद्दा उचलून धरत अन्यायाला वाचा फोडली आहे तर एक प्रकारचा संघटीत दबावही निर्माण केला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणारे जेव्हढे आहेत त्यापेक्षा अधिक चांगल्या कामासाठी वापर करणारेही आहेत. त्यामुळे कुणाची निर्भत्सना, कुणाची वैचारिक विटंबना न करता समाजाच्या उन्नतीसाठी सोशल मीडियाची शक्ती विधायक कार्याला लावता येईल.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय/
१२.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *