कुपोषण मुक्ती अंतर्गत संवाद कार्यशाळा व राष्ट्रीय पोषण माह समारोप कार्यक्रम पार्डी येथे संपन्न;आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केली रानभाज्याची पाहणी

लोहा ; प्रतिनिधी

स्वयं शिक्षण प्रयोग, नांदेड मार्फत आरोग्य आणि पोषण प्रकल्प कमल उदवाडिया फौंडेशन तर्फे उद्देश पूर्ण सप्टेंबर महिना हा साजरा केला त्या कार्यक्रमाचा सामारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अनेमिया आणि लहान मुलांन मधील कुपोषण मुक्ती अंतर्गत संवाद कार्यशाळा व राष्ट्रीय पोषण माह समारोप कार्यक्रम विक्की गार्डन, पार्डी येथे साजरा करण्यात आला विशेष म्हणजे दक्षिण नांदेड चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी विविध रानभाज्याची पाहणी केली.

या कार्यक्रम पार्श्वभूमी वर लोहा तालुक्यातील सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 30 गावा मध्ये गावपातळी वरील पोषण मेळावे साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये दक्षिण नांदेड चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे, पूर्व तालुका कृषी अधिकारी मंगनाळे, महिला व बालविकास तर्फे पोलावार, सोनखेड प्राथमिक केंद्र च्या पर्यवेक्षक दवे मॅडम उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच स्वयंम शिक्षण प्रयोग तर्फे सहयोगी संचालक नसीम शेख, जिल्हा समन्वयक रविराज बोराडे आणि तालुका समन्वयक रेवती कानगुले सोबत 30 गावा मधून प्रशिक्षित 30 आरोग्य सखी आणि 30 महिला लीडर उपस्थित होत्या.

कार्यक्रमा मध्ये गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान मुलांचा संतुलित आहार ,राणभाज्या व गावपातळीवर मिळणारे फळे याचे प्रदर्शन करण्यात आले या सोबत कार्यक्रमा मध्ये सर्व महिला लिडर आणि आरोग्य सखी यांनी प्रकल्पा मुळे गावामधील अनेमिया आणि कुपोषण च्या प्रमाणात घट होउन सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत होत असलेल्या बदला बद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रम मध्ये सर्वांनी शारीरिक अंतर, सानिटायझर, आणि तोंडाला मास्क लावून कोरोना प्रतिबंध नियम पाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *