नांदेड ; दिगांबर वाघमारे
भारतीय जनता पार्टीने माझी भाजपा महीला आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षापदी निवड करुन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांचे आभार मानून नांदेड जिल्हासह राज्यातील महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याठी मी सतत प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन युगसाक्षी लाईव्हशी बोलताना सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले .
लोहा तालुक्यातील सुनेगाव येथे दि.१५ रोजी आयोजित सत्कार प्रसंगी सौ.सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर बोलत होत्या .त्या पुढे म्हणाल्या की
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी दादा ,विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस ,महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे,जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,सुर्यकांताबाई पाटील,भास्करराव खतगावकर,माधवराव किन्हाळकर,या सर्वांनी माझ्यावर संघटनेमध्ये पक्षानी जी जबाबदारी दिली आहे.
त्याबद्दल आभार मानून महिला म्हणून जी संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करुन येत्या काळात महिला संघटन वाढवणे, महिलांच्या विविध कामासाठी मोर्चे आंदोलन काढून महीलांना बळकटी व स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाचे व्यापकता वाढवण्याठी व तळागाळातील महिलांपर्यत पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक शरद पवार,प.स.सदस्य दत्ता वाले, सरपंच दिलीप पाटील कारेगावकर,राजहंश शहापुरे, उत्तमराव पाटील पवार ,उपसभापती नरेंद्र गायकवाड ,बाळु पवार , हरी कोरडे , गोलेगावचे माजी सरपंच काशिनाथ फुले ,प्रभाकर कदम आदीची यावेळी उपस्थिती होती.
****************** video news ******** सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर