हरसद येथील सम्यक बुद्ध विहारांच्या लोकार्पण सोहळ्याचे जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमात उदघाटन
लोहा / प्रतिनिधी
या भागाचा आमदार जरी काँग्रेसचा असला तरीही खासदार आपला आहे तेव्हा रस्त्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ . प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी हरसद येथे आज दिनांक 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनी सम्यक बुद्ध विहारांच्या लोकार्पण सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी केले.
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील मौजे हरसद येथे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या स्थानिक खासदार फंडातून पाच लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सम्यक बुद्ध विहाराचा आज दिनांक १४ ऑक्टोंबर धम्मचक्र परिवर्तन या ऐतिहासिक दिनी सोहळा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषद सदस्या सौ . प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून दीप प्रज्वलन करून व ध्वजारोहण करून सम्यक बुद्ध विहार या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय दूरसंचार समितीचे सल्लागार सदस्य साहेबराव पाटील काळे ,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारतळेकर , बाजार समितीचे संचालक अंकुश पाटील कदम, भाजपाचे नांदेड तालुका अध्यक्ष सुनील मोरे, पंजाबराव देशमुख, दापशेडचे सरपंच विरभद्र राजुरे ,कारेगावचे सरपंच राम पाटील किरवले,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रणिताताई देवरे -चिखलीकर म्हणाल्या की,आज दिनांक 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनी हरसद येथील बुद्धविहाराचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले यामुळे मी फार धन्य समजते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे औरंगाबादला पक्षाची बैठक असल्यामुळे येऊ शकले नाहीत व नंतर त्यांना मुंबईला जायचे आहे. यावेळी पावसानेही पुष्पवृष्टी करून स्वागत केले आपले सर्वांचे प्रेम साहेबांवर आहे . साहेबांचा कार्यक्रम म्हटलं तर पाऊस येतोच कधी तर मे महिन्यात ही कार्यक्रमाच्या वेळेस पाऊस पडतो. साहेबांनी कधीही जात-पात पहिली नाही सर्व आपलं कुटुंब आहे त्यावेळी बुद्धविहाराला पाच लाखाचा निधी दिला तेव्हा पाच लाखाचा निधी होता जिल्हा परिषदेवर मी व प्रवीण पाटील आहे त्यामुळे निधी कमी पडला नाही . आपल्याला सायकल असेल तर मोटरसायकल घ्यावी अशी अपेक्षा असते त्याप्रमाणे गावचा कितीही विकास केला तरी कमीच आहे. नरेंद्र हा माझा भाऊ आहे.
राज्यात 3 विकास आघाडीचे सरकार आहे पण शेतकऱ्याच्या बाजूने तीन विकास आघाडीने आपल्या भागात कसलाही विकास केला नाही . मुख्यमंत्री घरातच आहेत घराच्या बाहेर निघत नाहीत राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे या सरकारच्या काळात 47 महिलांवर अत्याचार झाला त्यामुळे आम्ही औरंगाबादला आंदोलन केलं. आपण स्वतःची काळजी घ्या कोरोनाचा काळ आहे. या भागाचा आमदार जरी काँग्रेसचा असला तरी खासदार आपला आहे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हिंदू मुस्लीम सर्वांना सोबत घेऊन जाऊत पाऊस आपल्या कार्यक्रमाला येतो पाऊस हा आपली निशाणी आहे असे प्रणिताताई देवरे -चिखलीकर म्हणाल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक तथा लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले आपल्या प्रास्ताविकेत उपसभापती नरेंद्र गायकवाड म्हणाले की, बुद्ध विहारासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला त्यात सभागृहाचे बांधकाम केले व बुद्ध विहाराचे घुमटाचे काम आम्ही गावात वर्गणी करून केले अतिशय सुंदर व आकर्षक बुद्धविहाराचे काम केले आहे. हे काम करताना आम्हाला हौदाचे काम करायला आमच्या् भगिनी जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी दोन लाख रुपयांचा निधी दिला. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर सी.सी. रस्त्याच्या कामास तीन लाखाचा निधी दिला. गावात तीव्र पाणीटंचाई असताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी गावात दोन बोअरला निधी दिला व दोन बोअर पाडल्या बोअरला भरपूर पाणी लागले गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मला पंचायत समितीचे तिकीट कलंबर गणातून दिली मला पंचायत समिती सदस्य केले लोहा पंचायत समितीचे उपसभापती केले मान सन्मान दिला आता साहेबांना काही मागायचे नाही त्यांनी भरपूर दिले आमचे गाव नांदेड दक्षिण मध्ये होते व ते नांदेड लोकसभेमध्ये असल्यामुळे साहेब खासदार झाल्यामुळे आमचा फार आनंदच आनंद झाला पण तिकडे लोहा मतदार संघाचे वाटोळे झाले असे उपसभापती नरेंद्र गायकवाड म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला हरसदच्या सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, उपासक-उपासिका व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम सोशल स्टेशन पळून संपन्न झाला. आभार निलेश पवार यांनी मानले.