स्वारातीम विद्यापीठास शासनाचा पाच कोटींचा निधी …. ; पालकमंंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश


नांदेड –

येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी शासनाने आनखी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. विद्यापीठाच्या विकासासाठी हा निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते.


देशात व राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या उन्नतीसाठी सर्वशिक्षा अभियान राबविण्यात आले. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये याचा मोठा फायदा झाला. याच पध्दतीने उच्च शिक्षणात सुध्दा अशा प्रकारची योजना फलदायी ठरू शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व उच्च शिक्षणाच्या सबलीकरणासाठी शासनाने राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (रुसा) योजना बाराव्या आणि तेराव्या पंचवार्षीक योजनेमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षणात गुणवत्ता सर्वदूर संधी, समानता यासाठी शासनाने तयार केलेल्या राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियानास शासनाने मान्यता दिली आहे.


या योजनेअंतर्गत राज्यातील विविध विद्यापीठांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेडच्या स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी या योजनेतून 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.त्यापैकी 15कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले होते.त्यातून विद्यापीठ परिसरात अनेक इमारतीचे काम हाती घेण्यात आले होते.परंतु उर्वरित 5 कोटी न मिळाल्यामुळे ही कामे रखडली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या नांदेड दौऱ्याच्या वेळी हा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हा उर्वरित 5कोटी निधी मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केला होता.त्याची फलश्रुती म्हणून हा पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आता विद्यापीठाची उर्वरित कामे पूर्ण होणार आहेत. याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विद्यापीठातर्फे आभार मानण्यात आले आहेत.

One thought on “स्वारातीम विद्यापीठास शासनाचा पाच कोटींचा निधी …. ; पालकमंंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *