इतिहास निर्मितीच्या दिशेने ओबीसी समाज..!

१८ ऑक्टोबर..

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष – लोकजागर अभियान
•••

‘आमची जनगणना, आम्हीच करणार !’ हे लोकजागर अभियानचे पाऊल नावीन्यपूर्ण आहे, यात संशय नाही. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यातून एका नव्या इतिहासाची पायाभरणी होणार आहे ! अतिशय सुस्त आणि स्वतःच्या हक्काबाबत उदासीन असलेला ओबीसी समाज मात्र आता जागा होतो आहे, अशी लक्षणं स्पष्ट दिसायला लागली आहेत. आणि म्हणूनच या जनगणना सत्याग्रहाला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटीच्या घरात आहे. म्हणजे ओबीसी समाज सुमारे ६ कोटी तर नक्कीच आहे. एवढ्या मोठ्या समूहाची जनगणना करायची तर सरकारला करोडो रुपये लागले असते. आणि आमच्याकडे काहीच नाही. पैसा नाही, साधनं नाहीत. सत्ता नाही. ओबीसी नेत्यांमध्ये इतर समाजासारखे स्पिरीट नाही. स्वतःच्या खिशात हात घालण्याची बिचाऱ्यांना सवय राहिली नाही. इतरांच्या खिशात घातलेले हात बाहेर निघत नाहीत. अशावेळी विस्तीर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या सहा कोटी ओबीसींची जनगणना कशी करायची ? एवढा पैसा आणि साधनं कुठून आणायची ? असे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे ! अजूनही समाजातील संवेदना जिवंत आहे, यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच लोक स्वतःहून पुढे येत आहेत. आपापले योगदान देत आहेत. १८ तारखेला अजुन वेळ आहे..पण मला विश्वास आहे, की जसजशी वेळ जवळ येईल, तसतसे ह्या सत्याग्रहाला नैसर्गिक बळ मिळत जाईल ! समाजातील संवेदनांचे झरे मुक्त होतील, उसळी मारून वर येतील..! सत्याहाचा प्रवाह सर्व बाजूंनी विस्तीर्ण होत जाईल. ओबीसी, बहुजन, अल्पसंख्यांक, समतावादी लोक यात सहभागी होत जातील..!

अजिंक्य भारत या मान्यवर दैनिकाचे संपादक पुरुषोत्तम आवारे यांनी स्वतःहून सत्याग्रहाची जाहिरात १६/१७/१८ ऑक्टोबर अशी तीन दिवस विनामूल्य प्रकाशित करण्याचं जाहीर केलं आहे. सहकार्याचा प्रारंभ त्यांच्यापासून झाल्यामुळे आम्ही सर्वात आधी त्यांचे आभार मानतो ! एका राजकीय पक्षाचे नेते, विधान सभेचे उमेदवार विनोद पाटील हे देखील काल प्रत्यक्ष भेटायला आलेत. नागपूर जिल्ह्यासाठी काही पोस्टर्स, बॅनर्स छापून देण्याची जबाबदारी स्वयम् प्रेरणेने त्यांनी घेतली आहे. अशा प्रकारे ठिकठिकाणी लोक समोर येतील, याची आम्हाला खात्री आहे. मी त्यांचेही आभार मानतो !

जे तुझ्या स्वप्नात आहे
तेच मीही गात आहे
ओळखी झालीच कोठे

ही तशी सुरुवात आहे !

पण मुख्य मुद्दा जनतेच्या सहभागाचा आहे. आणि तो वाढतो आहे. जिल्हा, तालुका, गाव, वॉर्ड, प्रभाग अशा विविध पातळीवर आम्हाला सत्याग्रह समन्वय समित्या गठीत करायच्या आहेत. तशी सुरुवात झालेली आहे. अमरावती विभागाचे समन्वयक प्रभाकर वानखडे हे पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची समिती सर्वात आधी गठीत करून देण्याच्या जिद्दीने कामाला लागले आहेत. त्यांचा झपाटा बघता, अमरावती विभाग पहिल्या नंबरवर राहील, असा विश्वास वाटतो. अर्थात ही समाजासाठी काम करण्याची आणि आपल्याच परिवारातील निरागस स्पर्धा आहे ! त्या स्पर्धेत इतर विभागांनी देखील सहभागी होऊन अमरावती विभागाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा.. अमरावती विभागाचं आव्हान स्वीकारलं पाहिजे ! बघू या..!

या क्षणापर्यंत सत्तर पेक्षा जास्त नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. साधारणपणे २५ जिल्ह्यात संघटनात्मक ढाचा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. लौकरच संपूर्ण महाराष्ट्रात संघटन उभे होईल असा विश्वास आहे. सुरुवातीला काही चुका होतील, काही त्रुटी राहून जातील, त्या दूर करत पुढे जावे जाऊ या. काही जबाबदाऱ्या मध्ये बदलही करावे लागतील. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ते करू या. शेवटी आपण सारे सत्याग्रही आहोत. कुणीही लहान मोठे नाही. याची जाणीव ठेवू या..! एकमेकांना समजून घेवू या..! ओबीसी समाजातील शेकडो जातींचे विविध समूह एका प्रवाहात आणण्याचा हा ऐतिहासिक प्रयत्न आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडीफार खळखळ होणे स्वाभाविक आहे. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आणि एका समर्थ, सुदृढ, संतुलित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण हवा तो त्याग करायला तयार असलं पाहिजे !

आम्हाला एका हातात गांधीजींची काठी आणि दुसऱ्या हातात बाबासाहेबांची घटना घेवून पुढचा प्रवास करायचा आहे..! १८ ऑक्टोबर २०२०, रोज रविवारला आम्ही ह्या प्रवासातील पहिलं पाऊल उचलणार आहोत. आपले आशीर्वाद आणि आमच्या पावलांना, आपल्या पावलांची साथ मिळाली.. तर..

महाराष्ट्रात नवा इतिहास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्हाला खात्री आहे !

आम्ही आपली वाट पाहू..
असतील त्या साधनासह..
असाल त्या जिल्ह्यात..

असाल त्या गावातून..!

मी निघालो पुढे, या क्षणापासूनी

जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे ?

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
एम. एस. मिरगे
महासचिव

लोकजागर अभियान

ओबीसी जनगणना सत्याग्रह
विभागीय संपर्क प्रमुख
• मनीष नांदे – प्रदेश संघटक
9545025189
• चंद्रकांत लोणारे – केंद्रीय कार्यालय –
960014116
• डी. व्ही. पडिले – मराठवाडा
9890585705
• मुंबई विभाग – रवींद्र रोकडे
9773436385
• कोकण विभाग –
चंद्रकांत लोणारे –
9960014116
समीर देसाई
9004048002
• पश्चिम महाराष्ट्र –
महेंद्र शेंडे –
8055502228
राजकुमार डोंबे
7378583559
• उत्तर महाराष्ट्र – चंद्रकांत लोणारे
9960014116
• अमरावती विभाग – प्रभाकर वानखडे
8806385704
• नागपूर विभाग – महेंद्र शेंडे
8055502228
•••
सत्याग्रहात सामील होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती/संस्था/संघटना यांनी आपापल्या भागाशी संबंधित खालील नंबरवर संपर्क करावा.
•••
पूर्व विदर्भ समन्वय समिती
• महेंद्र शेंडे –
8055502228
• श्यामराव झाडे –
9403197171
• प्रा. प्रभाकर पावडे –
7218100973
• डॉ. दिवाकर भोयर –
8551901556
• प्राचार्य डॉ रामचंद्र गोलाईत –
9422802084
• मोरेश्वर दोनाडकर –
7721921551
• नंदकिशोर अलोने –
8446000461
पश्चिम महाराष्ट्र समन्वय समिती
• हणमंतराव पवार –
9765104141
• विठ्ठलराव वठारे –
8087535296
• रेखा पाटील –
9922499215
• महादेव पाटील –
9422396814
जिल्हा समन्वयक
• कोल्हापूर जिल्हा – विजय कुंभार –
9373227928
• नगर जिल्हा – झोडगे सर –
9146320626
• संतोष बोरुडे – अहमदनगर तालुका ( ग्रामीण ) समन्वयक –
7721033329
पूर्व विदर्भ – जिल्हा समन्वयक
• नागपूर जिल्हा – अशोक कडू –
9270236255
• किशोर बोरकर –
9373280124
• विनोद पाटील –
9823191123
• प्रज्वल कोटांगळे –
7083181997
• नंदकिशोर रामटेके –
8668877951
• कपिल वानखेडे –
7798188838
• वर्धा जिल्हा – राजेश बाभुळकर
9422753961
• अजय रामभाऊ इंगोले –
9421703391
• विनोद राजगुरे –
7219645485
• विनोद शिंदे –
9970777793
• तळेगाव समन्वयक – चंद्रशेखर दुर्गे –
9527599098
• गोंदिया जिल्हा – भुमेश्वर शेंडे –
9145742868
• गडचिरोली जिल्हा – प्रभाकर कुबडे –
9422154759
• चंद्रपूर जिल्हा – नकटू मंगरुजी सोनुले –
9405149773
• अमित डोमाजी पाल – पोंभूर्णा तालुका समन्वयक –
8888280025
पश्चिम विदर्भ – जिल्हा समन्वयक
• अकोला जिल्हा – शिवा भटकर
9673231692
• अॅड. भारत सावळे –
9673351248
• अॅड. मधुकर तऱ्हाळे –
9763287992
• वाशिम जिल्हा – राम नाखले –
7588090666
• विकास गवळी –
7249681881
• बुलढाणा जिल्हा – विठ्ठल घुले –
9850595131
• चंद्रकांत टेरे –
9922783328•9850207985
• मोहन पिंपळे –
9850329056
• यवतमाळ जिल्हा – अशोक गौरकार –
84858 60667
• प्रवीण सोनोने –
99222 92862
• किसन काळे –
9767661043
• कृष्णा थेरे – पांढरकवडा तालुका समन्वयक – 9511805287
• राम फुलकर – यवतमाळ तालुका समन्वयक –
75586 75463
• विनोद भोंग – झरी तालुका समन्वयक –
9657873537
मराठवाडा – जिल्हा समन्वयक
• औरंगाबाद जिल्हा – एस. एस. खंडाळकर –
9850304253
• लातूर जिल्हा – अंतेश्वर कुदरपाके –
9561733443
• गणेश संजीव मरेवाड – तालुका समन्वयक –
9049518901
• गोविंद व्यंकटेश पोलकुपे – 7620866848•9765741644
उत्तर महाराष्ट्र – जिल्हा समन्वयक

• नाशिक जिल्हा – अमोल गोरडे – 9922734678

कोकण विभाग – जिल्हा समन्वयक
• ठाणे जिल्हा – ज्ञानेश्वर हुकमाळी
8850114021
• नितीन साळवी –
8691877781
• रत्नागिरी जिल्हा – विक्रांत कांबळे –
9324316602
• सूर्यकांत पागडे –
8451877208
मुंबई विभाग – तालुका समन्वयक
• शरद ठाकरे – भिवंडी तालुका समन्वयक – 9665707736•9270759068
• विजय केसरकर – मुलुंड तालुका –
9890009643
• भरत कृष्णा भेरे – अंबरनाथ तालुका – 92722315372•9226995912
• सचिन राठोड – वांद्रे तालुका –
9594249354
• सुनील दाहिजे – गोरेगाव तालुका –
8767082671
• सिद्धार्थ माने – जोगेश्वरी तालुका – 8850081007
• विशाल मोरे – दापोली
7045070886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *