कौडगाव येथे अवैद्य वाळू उपसा जोमात लोहाचे महसूल विभाग कोमात ?

मारतळा येथे महसूल पथकाची तात्काळ नेमणूक करावी : विक्रम पाटील बामणीकर याची निवेदना द्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नांदेड प्रतिनिधी ;


 लोहा तालुक्यातील अगदी टोकावर असलेल्या कौडगाव येथे दिवसभर अवैद्य रेती उपसा केला जातो व रात्रीच्या वेळी रेती वाहतूक करून इतर ठिकाणी नेल्या जात आहे त्यामुळे गोदावरीचे पात्र धोक्यात आले आहे कौवडगाव येथे शासनाने कुठल्याही प्रकारे लिलाव केला नसतानाही या ठिकाणी दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळू उपसा तराफ्यावर केला जात आहे.


 कौवडगाव गोदावरी नदी पात्रात दहा ते पंधरा मोठे तराफे असून या साह्याने १०० मजूरा द्वारे तराफ्यावर दिवसभरात शेकडो ब्रास अवैद्य वाळू उपसा केला जात आहे यात शासनाचा हजारो चा महसूल बुडत असून या ठिकाणचे तलाठी जाधव व मंडळ अधिकारी हे अवैद्य वाळू उपसाला आर्थिक व्यवहा पोटी पाठबळ देत असून या वाळू उपशाकडे ते फिरकू नही बघत नाही त्यामुळे गावकर्यातून तलाठी व मंडळ अधिकारी हे आर्थिक व्यवहारात पोटे यांच्याकडे कानाडोळा करत असल्याचे बोलल्या जात आहे .


पण तहसीलदार देखील या वाळू उपसा कडे फिरूनही बघत नाहीत व कौडगाव परिसरात आता सध्या अवैध वाळू उपसा चालू आहे प्रकरणी गेल्या दोन वर्षात लोहा तहसील व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही त्यामुळे तहसीलदारापासून मंडळ अधिकारी व तलाठी यांचे हात ओले केले असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे त्यामुळे मा जिल्हाधिकारी साहेब यांनी कौडगाव येथे दिवसाढवळ्या होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करून वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी


 व शासनाचा महसूल बुडणाऱ्या वाळू माफिया कडून महसूल वसूल करावा व अवैध वाळू उपशाला आर्थिक व्यवहारापोटी त्यांच्याकडे कानाडोळा करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी आज जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे लोहा तालुक्यातील होत असलेल्या अवैद्य वाळू उपसा प्रकरणी निवेदन देऊन कौडगाव येथील होणारा अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा व मारतळा येथे महसूल पथक कायमस्वरूपी देण्यात यावे असेही निवेदनात विक्रम पाटील बामणीकर यांनी म्हटले आहे.


 त्यामुळे तहसीलदारांनी देखील यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे कौडगाव येथे गेल्या वर्षी देखील हजारो ब्रास अवैध वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आली होती या प्रकरणी अनेक वेळा निवेदन देण्यात आले तरीदेखील तहसीलदार यांनी यावर कारवाई करण्याचे धाडस केले नाही ?

असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते पण तहसीलदार परळीकर यांनी कौडगाव परिसरात गेल्या दोन वर्षात कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे जिल्हा अधिकारी साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही शिवराज्य संघटनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख नांदेड यांनी म्हटले आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *