कंधार ; दिगांबर वाघमारे
पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाःचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.त्यबद्दल पंचनामे करणे चालु असून पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ होईल मात्र कायम स्वरुपी चांगले दिवस येण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंद्याची कास धरुन स्मार्ट बनावे तसेच कंधार येथे सुरु झालेले हमीभावाने धान्य उडीद,मूग,सोयाबीन खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कंधार येथे केले.
दि.१५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार जि. नांदेड व दि. महाराष्ट्र को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत हमीभावाने धान्य उडीद,मूग,सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ सोहळाचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री.डॉ. विपीनजी इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष -लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे ,तरकार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या -सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,विशेष अतिथी- श्रीमती वर्षा ठाकूर(मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड),माजी जी.प.सदस्य रावसाहेब पाटील,जि. प.सदस्य चंद्रसेन पाटील,श्याम अण्णा पवार,नगरसेवक जीवन चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष कंधार सलाम साहेब,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे,उपसभापती अरुण पा.कदम,आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की बाहेर देशात शेतकरी हे गटशेती करतात तसेच विविध प्रयोगातून बारा महीने उत्पन्न मिळवतात त्याच धर्तीवर आपल्या शेतकऱ्यांनी देखील विविध शेतीला पुरक जोडधंदे सुरु करावेत .तसेच काही शेतकरी टोकाचे पावले उचलून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात ते चुकीचे असल्याचे सांगितले .
———————————————
कंधार लोहा तालुक्याची ५० टक्के पेक्षा खाली आणेवारी — आमदार श्यामसुंदरजी शिंदे ***
कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार जि. नांदेड व दि. महाराष्ट्र को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत हमीभावाने धान्य उडीद,मूग,सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ सोहळाच्या अध्यक्षिय समारोप प्रसंगी आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले आहे.मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने सरसगट शेतकऱ्यांना आर्थीक मदत मिळणे गरजेची असून ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी काढून कंधार लोहा तालूका अओला दुष्काळ जाहीर करावा असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना विनंती केली.
ते पुढे म्हणाले की कंधार येथे गेल्या विस एक वर्षापासुन बाजार समिती असून व्यापारीवर्गानी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट चालवली होती.परंतु आजपासून शेतकऱ्यांचे सोयाबिन हमीभावाने खरेदी करुन त्याची होणारी लुट निश्चितपणे थांबणार असल्याचे सांगितले .
यावेळी सर्व संचालक मंडळासह मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग,कार्यकर्ते, शेतकरी बांधव व पत्रकार मित्र उपस्थित होते…