डॉ.ए.पी.जे कलाम, यांच्या जयंती निमित्त कंधार येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय वाचन प्रेरणा दिन साजरा.

कंधार ; ता.प्र.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे आज 15 ऑक्टोबर भारतरत्न, मिसाईलमॅन, माजी राष्ट्रपती, डॉ. एपीजे कलाम यांच्या जयंती निमित्त वाचनालयात सर्वप्रथम डॉ. ए.पी.जे कलाम, यांच्या प्रतिमेस मोहम्मद रफीक सत्तार स.ग्रंथपाल यांनी पुष्पहार अर्पण केले. तसेच डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी श्री जितेंद्र ठेवरे ग्रंथालय प्रमुख, ग्रंथालय कर्मचारी मिलिंद महाराज, राधाबाई जवादवाड, लता ढवळे, कीशन भालेराव, तसेच वाचक उपस्थित होते. यानंतर दुपारी दोन वाजता महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय मुंबई तर्फे ऑनलाईन पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी व वाचक युट्युब द्वार महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालया तर्फे आयोजित कार्यक्रमत सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *